Nana Patole : ‘लाडक्या बहिणींना बेईमान भावांनी फसविले’; आमदार नाना पटोलेंचा सरकारवर हल्ला

भंडारा : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 13 हजार कोटी रुपये खर्च केल्याची तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत 17 हजार कोटी रुपये दिल्याची जाहिरात केली जाते. मात्र, सरकारने कथितरित्या दहा उद्योगपतींचे साडेतीन लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, त्याची जाहिरात सरकारने कधी केली का?, असा सवाल उपस्थित करतानाच ‘लाडक्या बहिणींना बेईमान भावांनी फसविले’ असा आरोप काँग्रेसचे आमदार नाना पटोले […]

Nana Patole : ‘लाडक्या बहिणींना बेईमान भावांनी फसविले’; आमदार नाना पटोलेंचा सरकारवर हल्ला

भंडारा : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 13 हजार कोटी रुपये खर्च केल्याची तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत 17 हजार कोटी रुपये दिल्याची जाहिरात केली जाते. मात्र, सरकारने कथितरित्या दहा उद्योगपतींचे साडेतीन लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, त्याची जाहिरात सरकारने कधी केली का?, असा सवाल उपस्थित करतानाच ‘लाडक्या बहिणींना बेईमान भावांनी फसविले’ असा आरोप काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केला. भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील चारभट्टी येथे  हनुमान चालीसा पठण व श्रावणमास समाप्ती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता सरकारवर जोरदार टीका केली. 

हेही वाचा : Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरारक खेळ जीवावर बेतला, थरावरून कोसळून एका गोविंदाचा मृत्यू; तर खांब अंगावर पडल्याने सात वर्षीय चिमुकल्याचा करुण अंत

यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 13 हजार कोटी रुपये दिल्याचे सांगते. तसेच लाडक्या बहिणींना 17 हजार कोटी रुपये दिल्याची जाहिरात टीव्ही, वर्तमानपत्रे आणि इतर माध्यमांतून केली जाते. मात्र, दहा उद्योगपतींचे साडेतीन लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याचे सांगितले जाते. एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जासाठी दहा-बारा वर्षे वापरता आली असती, असे त्यांनी म्हटले. ‘त्या दहा उद्योगपतींचे कर्ज माफ केल्याची जाहिरात टीव्हीवर दाखवली का? तुम्ही पाहिली का?’, असा सवालही त्यांनी उपस्थितांना केला.

‘लाडकी बहीण’ योजनेवरही पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकारकडून बहिणींना मिळणाऱ्या विविध योजनांपैकी अनेक योजना एकएक करून बंद केल्या जात असल्याचा आरोप करत, ‘हे बेईमान भाऊ आहेत, बहिणीचे सख्खे भाऊ नाहीत. लाडक्या बहिणींच्या नावाने या बहिणींना फसविले,’ अशी टीका नाना पटोले यांनी सरकार वर केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number