६ ऑगस्ट, २०२४, हिंगोली : हिंगोलीच्या घोटा देवी गावातून जगदंबा देवीची पालखी शेगावकडे रवाना झाली आहे. या पालखीचा बाबुळगाव परिसरातील माळरानावर अनोखा रिंगण सोहळा पार पडला. या पालखी सोहळ्यामध्ये अश्वाचे नाही तर मेंढ्यांचा रिंगण सोहळा पार पडतो. मंगळवारी सकाळी हा रिंगण सोहळा पार पडला आहे. रिंगण सोहळा पाहण्यासाठी गावातील भाविकांनी गर्दी केली होती. या अनोख्या रिंगण सोहळ्यानंतर ही पालखी मार्गस्थ झाली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.