Mumbai Shocker: मामा अन् भाचीचं जुळलं सूत! लग्न करण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद; संतापलेल्या मामाने ट्रेनमधून ढकलून घेतला भाचीचा जीव

आरोपी मामा पोलिसांच्या ताब्यात असून, त्याला वसई न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
Mumbai Shocker: मामा अन् भाचीचं जुळलं सूत! लग्न करण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद; संतापलेल्या मामाने ट्रेनमधून ढकलून घेतला भाचीचा जीव

Mumbai Shocker: पालघर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईतील सातवली परिसरात अपहरण झालेल्या एका तरुणीच्या मृत्यू प्रकरणात पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेत भाचीसोबत प्रेमसंबंध असलेल्या तिच्या मामानेच तिचा जीव घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी मामा पोलिसांच्या ताब्यात असून, त्याला वसई न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकचं खळबळ उडाली आहे. 

प्राप्त माहितीनुसार, मृत तरुणी (काल्पनिक नाव – पूजा) हिचे आपल्या सख्ख्या मामासोबत गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. पूजा सतत मामाकडे लग्नाची मागणी करत होती, यामुळे दोघांमध्ये अनेकदा वाद व्हायचे. 16 नोव्हेंबरला तिच्या आईने वसईतील वालीव पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवली होती. पूजा बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीय तिच्या सुरक्षिततेबाबत चिंतेत होते. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पूजाचा शोध घ्यायला सुरुवात केली.  

हेही वाचा – Delhi Blast Updates : दिल्ली स्फोटात पाकिस्तानाचाच हात, आत्मघातासाठी पाक हँडलरकडून उमरचं ब्रेनवॉश

दरम्यान, आरोपी मामा एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. शनिवारी पूजा तिच्या घरातून मामाच्या घरी आली होती. पूजाचा मामा वसईतील गावराई पाडा भागात राहत होता. 17 नोव्हेंबर दुपारी पूजा आणि मामा चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये प्रवास करत होते. भाईंदर ते वसई दरम्यान, ट्रेनमध्ये प्रवास करताना त्यांच्यात वाद झाला. संतापलेल्या आरोपीने अचानक पुजाला ट्रेनमधून खाली ढकलले. या घटनेत पूजाचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी ट्रेनमध्ये उपस्थित काही प्रवाशांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि वसई रोड रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.

हेही वाचा – Anmol Bishnoi: अनमोल बिश्‍नोईची अमेरिकेतून हकालपट्टी; भारतात परतल्यावर त्याचे पाय आणखीन खोलात

आरोपी विरोधात गुन्हा दाखल  

वालीव पोलिस ठाण्यात आधीच अपहरणाचा गुन्हा नोंद असल्याने रेल्वे पोलिसांनी आरोपी मामाला पुढील कारवाईसाठी वालीव पोलिसांकडे सुपूर्द केले. तपासात मामा–भाचीच्या प्रेमसंबंधांची माहिती उघड झाल्यानंतर पोलिसांनी खूनासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या संतापजनक घटनेमुळे सातवलीसह वसई परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version