Manoj Jarange Patil : ‘आम्ही मुंबईत कुठेही आंदोलन करणार, अडवून दाखवा’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

अंतरवाली सराटी : ‘आम्ही मुंबईला येणार, तुम्ही परवानगी द्या नाहीतर नका देऊ, सरकारने दादागिरी करू नये, मुंबई का तुमच्या बापाची पेंड आहे का?’; असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला. मुंबईत आझाद मैदानात आंदोलनासाठी जरांगेंनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी कठोर अटिशर्थी लावत एका दिवसाची परवानगी दिली आहे. यानंतर जरांगेंनी […]

Manoj Jarange Patil : ‘आम्ही मुंबईत कुठेही आंदोलन करणार, अडवून दाखवा’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

अंतरवाली सराटी : ‘आम्ही मुंबईला येणार, तुम्ही परवानगी द्या नाहीतर नका देऊ, सरकारने दादागिरी करू नये, मुंबई का तुमच्या बापाची पेंड आहे का?’; असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला. मुंबईत आझाद मैदानात आंदोलनासाठी जरांगेंनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी कठोर अटिशर्थी लावत एका दिवसाची परवानगी दिली आहे. यानंतर जरांगेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला असून मराठे मुंबईला येणार आहेत म्हणून सरकारने नियम लावले, त्यामुळे रोष वाढतो आहे. सत्ता आम्ही तुमच्या हातात दिली आणि तुम्ही त्याचा गैरवापर करता. मुंबईत तुम्हाला अडथळा नकोय, तर आमचे प्रश्न सोडवा. फडणवीसांनी पुन्हा हल्ला करण्याच्या नादात पडू नये. आम्ही मुंबईत रेल्वे पटरी, विमानतळ, रोडवर कुठेही आंदोलक करू, दादागिरी नाही करायची. पाच टप्प्यात सहा करोड मराठा मुंबईत घुसलेला दिसेल, असा इशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. 

हेही वाचा : Khavdya Dongar Case: ”मला माफ करा…’ कुणालच्या शेवटच्या कॉलमुळे सर्वांना मोठा धक्का.. पण आयफोनसाठी नाही..’ मावशीनं सगळं सांगितलं

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला असून दुसरीकडे ओबीसी हक्कांसाठी लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबर रोजी मुंबईत धडक देण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही मोठ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या गृह विभागाने कठोर पावले उचलली. मुंबईत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आझाद मैदान व्यतिरिक्त इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी आंदोलने, जाहीर सभा किंवा धरणे धरण्यावर संपूर्ण बंदी घालण्यात आली. या अचानक काढलेल्या नियमांमुळे मुंबईत धडकण्याच्या तयारीत असलेल्या दोन्ही आंदोलक नेत्यांना मोठा प्रशासकीय दणका बसला. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगेंनी आक्रमक होत सरकारला ठणकावले.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number