Manoj Jarange Patil Dasara Melava: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आज बीड जिल्ह्यातील नारायण गड येथे मोठा दसरा मेळावा आयोजित केला होता. हजारो मराठा बांधव या मेळाव्यात उपस्थित होते. प्रकृती ठीक नसतानाही जरांगे यांनी खुर्चीवर बसून उपस्थितांना संबोधित केले आणि मराठा समाजासाठी महत्त्वाचे संदेश दिले. जरांगे यांनी उपस्थितांना दोन कानमंत्र दिले: मराठा समाजाने शासक आणि प्रशासक बनावे आणि प्रशासनात असतानाही भल्याभल्यांपुढे न झुकता न्यायासाठी उभे राहावे. मराठा आरक्षणाचा विषय हाताळताना जरांगे भावूक झाले, त्यांच्या डोळ्यात अश्रूही दिसले. मनोज जरांगे यांच्या भाषणातून मराठा आरक्षणाच्या लढ्याचा इतिहास, संघर्ष आणि समाजासाठी त्यांचा दृढ संकल्प स्पष्ट झाला.
मी संपूर्ण आयुष्य झिजवलं – मनोज जरांगे
मनोज जरांगे यांनी भाषणाच्या सुरुवातीस मराठा आरक्षणाच्या लढ्यावर भाष्य करताना सांगितले, ‘मी कधीच शांत बसलो नाही. संपूर्ण आयुष्य झिजवलं. सातारा संस्थान म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, हैदराबाद गॅझेट म्हणजे मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचा संघर्ष. राज्याला मराठ्यांकडून वेढा टाकण्याची ताकद माहित असल्यामुळे आरक्षण मिळू दिले जात नव्हते.’
हेही वाचा – Beed Dasara Melava : पंकजा मुंडे मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर झळकले; अंजली दमानियांची जोरदार टीका
दरम्यान, जरांगे पाटील विरोधकांवर निशाणा साधत म्हटले की, ‘आपले आणि दुसरे विरोधकांमध्ये फितुर व्हायला नको होतं. झाली असेल एखादी चूक, पण जीव धरणीला टेकला तरी मागे हटलो नाही. ही बाब फितुरांनी समजून घ्यायला हवी.’
हेही वाचा – Manoj Jarange: तब्येत बरी नसतानाही थेट नारायण गडाच्या दिशेने, जरांगे कोणत्या मुद्द्यांवर लक्ष वेधणार?
मराठा आरक्षणाचा यशस्वी लढा
जरांगे यांनी आपल्या कार्याची माहिती देताना सांगितले की, एका वर्षात 58 लाख लोकांना आरक्षण दिले, तीन कोटी मराठे आरक्षणात घातले. पुढील वर्षांत हैद्राबाद आणि पश्चिम महाराष्ट्रात जीआर मिळवला. दोन वर्षात संपूर्ण मराठा आरक्षण यशस्वी झाले. या मेळाव्यात जरांगे यांनी इतर राजकीय पक्षांवरही टीका केली. त्यांनी म्हटले की, ही लोकं आमच्यासोबत नाहीत, पण मिळालेल्या यशाचं समाधान देखील व्यक्त करू देत नाहीत. पांढरे कपडे घालून, गाडीत बसून किंवा टीव्हीवर दिसून मर्दानगी दाखवता येत नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.