Manoj Jarange Patil : ‘वेळ आली तर राजीनामा दिला पाहिजे’; जरांगेंची विखे पाटलांवर जोरदार टीका

अंतरवाली सराटी :  राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठ्यांचं सर्वात मोठं वाटोळं केलं आहे. त्यांच्या एवढं कुणीच वाटोळं केलं नाही. त्यांनी गोड गोड बोलून आमचं वर्ष वाया घालवलं. मराठ्यांचं नुकसान केलं. विखेंनी देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न पूर्ण केलं, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील […]

Manoj Jarange Patil : ‘वेळ आली तर राजीनामा दिला पाहिजे’; जरांगेंची विखे पाटलांवर जोरदार टीका

अंतरवाली सराटी :  राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठ्यांचं सर्वात मोठं वाटोळं केलं आहे. त्यांच्या एवढं कुणीच वाटोळं केलं नाही. त्यांनी गोड गोड बोलून आमचं वर्ष वाया घालवलं. मराठ्यांचं नुकसान केलं. विखेंनी देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न पूर्ण केलं, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर हल्ला चढवला. विखे पाटलांनी आता तरी खरं बोलावं, असं आव्हानही त्यांनी दिलं. जरांगे पाटील मीडियाशी संवाद साधत होते.

हेही वाचा : Manoj Jarange: इकडे जरांगेंची प्रकृती बिघडली अन् तिकडे सरकारच्या हालचालींना वेग; रात्री अडीच वाजता फोन अन्…; मोठी अपडेट समोर

पुढे जरांगेंनी नमूद केले की, राधाकृष्ण विखे पाटील यांनी मला धमकी देऊ नये. अंतरवालीत नाही आलात तरी चालेल आम्ही बोलावलंही नाही, असं सांगत त्यांनी सरकारवर आपला राग व्यक्त केला. सत्तेचा आनंद घ्यावासा वाटतो, तसाच अपमानही पचवावा लागतो, अशी बोचरी टीकाही त्यांनी या निमित्ताने केली. सातारा संस्थानचं गॅझेज देतो बोलला होतात, त्याचं काय केलं सांगा? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. बावनकुळे, शिरसाटांनी मराठ्यांचं वाटोळं केल्याचा आरोपही त्यांनी केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number