Manikrao Kokate Health Update: माणिकराव कोकाटेंवर आज अँजिओग्राफी; पोलिसांचे पथक लीलावती रुग्णालयात दाखल

उच्च रक्तदाबाचा त्रास बळावल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोकाटे यांच्यावर आज थोड्याच वेळात अँजिओग्राफी करण्यात येणार आहे.<br/>
Manikrao Kokate Health Update: माणिकराव कोकाटेंवर आज अँजिओग्राफी; पोलिसांचे पथक लीलावती रुग्णालयात दाखल

Manikrao Kokate Health Update: नाशिकमधील बहुचर्चित सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास बळावल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोकाटे यांच्यावर आज थोड्याच वेळात अँजिओग्राफी करण्यात येणार आहे.

प्रकृती बिघडली, 'आयसीयू'मध्ये उपचार सुरू

नाशिक सत्र न्यायालयाने या प्रकरणात निकाल दिल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचा रक्तदाब अनियंत्रित झाला. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले. कोकाटे यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात (ICU) तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर नसल्याने डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असून, प्रकृतीचा सविस्तर वैद्यकीय अहवाल नाशिक पोलिसांना सोपवण्यात आला आहे. रुग्णालयात कोकाटे यांच्या पत्नी सीमा कोकाटे आणि मुलगी सीमंतिनी कोकाटे उपस्थित आहेत.

हेही वाचा – CM Fadanvis On Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या खात्याची जबाबदारी आता कोणाकडे? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

पोलिस ॲक्शन मोडमध्ये 

एकीकडे वैद्यकीय उपचार सुरू असताना दुसरीकडे कायदेशीर प्रक्रियेनेही वेग घेतला आहे. नाशिक पोलिसांचे एक पथक मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहे. कोकाटे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची तयारी सुरू असून, त्यांची प्रकृती लक्षात घेता हे वॉरंट रुग्णालयातच बजावले जाण्याची शक्यता आहे. अँजिओग्राफीचा अहवाल आल्यानंतरच त्यांना डिस्चार्ज कधी मिळणार किंवा पुढील कायदेशीर कारवाई कधी होणार, याचे चित्र स्पष्ट होईल.

हेही वाचा – Tapovan Tree Cutting: न्यायालयाचा मोठा निर्णय, तपोवन वृक्षतोडीवर सरकारला दणका, बजावली नोटीस

भाऊ विजय कोकाटे फरार; पोलिसांकडून शोध सुरू

याच घोटाळ्याप्रकरणी माणिकराव कोकाटे यांचे बंधू विजय कोकाटे यांच्याविरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. मात्र, विजय कोकाटे सध्या पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांचा ठावठिकाणा अद्याप स्पष्ट झाला नसल्याने नाशिक पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version