Zubeen Garg Death: जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; 4 जणांवर खळबळजनक आरोप, SIT कडून आरोपपत्र दाखल

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) शुक्रवारी गुवाहाटीतील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून चार आरोपींवर थेट गायकाला संपवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
Zubeen Garg Death: जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; 4 जणांवर खळबळजनक आरोप, SIT कडून आरोपपत्र दाखल

Zubeen Garg Death: प्रसिद्ध गायक जुबीन गर्ग यांच्या गूढ मृत्यू प्रकरणात आता तपासाला निर्णायक वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) शुक्रवारी गुवाहाटीतील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून चार आरोपींवर थेट गायकाला संपवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या आरोपपत्रामुळे गर्ग यांच्या मृत्यूमागील कट उघड झाल्याचा दावा तपास यंत्रणेकडून करण्यात आला आहे. आरोपपत्रानुसार, जुबीन गर्ग यांचे सचिव सिद्धार्थ शर्मा, सिंगापूरमध्ये झालेल्या ईशान्य भारत महोत्सवाचे आयोजक श्यामकानू महंत, तसेच बँड सदस्य शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रवा महंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच महोत्सवासाठी सिंगापूरला गेलेल्या जुबीन गर्ग यांचा 19 सप्टेंबर रोजी समुद्रात पोहत असताना संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता.

याशिवाय, जुबीन गर्ग यांचे चुलत भाऊ आणि निलंबित आसाम पोलीस अधिकारी संदीपन गर्ग यांच्यावर कटात थेट सहभाग नसलेल्या सदोष मनुष्यवधाचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, गायकाचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी नंदेश्वर बोरा आणि प्रबिन बैश्य यांच्यावर आयपीसी कलम 31C अंतर्गत गुन्हेगारी विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसआयटीने आतापर्यंत या प्रकरणात एकूण सात जणांना अटक केली असून, तपासादरम्यान 300 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. विशेष पोलीस महासंचालक एम. पी. गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली या तपासाला गती देण्यात आली होती.

हेही वाचा – Sonakshi Sinha Viral Video: सोनाक्षी-जहीरमध्ये कडाक्याचं भांडण, घराबाहेर राहिली अभिनेत्री; गोंधळ ऐकून शेजारीही बाहेर आले अन्

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी सांगितले की, जुबीन गर्ग यांच्या मृत्यूबाबत आसामच्या जनतेला दिलेले वचन एसआयटीने वेळेआधीच पूर्ण केले आहे. जुबीन गर्ग यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली होती आणि आज आरोपपत्र दाखल करून ती पूर्ण झाली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी यापूर्वी विधानसभेतही जुबीन गर्ग यांचा मृत्यू हा अपघात नसून कट असल्याचा ठाम दावा केला होता. दरम्यान, जुबीन गर्ग यांची पत्नी गरिमा गर्ग यांनी एसआयटीच्या आरोपपत्राचे स्वागत केले आहे. त्या म्हणाल्या, आमच्या कुटुंबाने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे तपास सुरू झाला आणि तो योग्य दिशेने गेला. यासाठी आम्ही तपास यंत्रणांचे आभार मानतो.

हेही वाचा – Bigg Boss Marathi : 'स्वागताला मनाची आणि घराची दारं उघडी ठेवा…', रितेश भाऊ घेऊन येत आहे महाराष्ट्राचं तुफान!

दरम्यान, गरिमा गर्ग यांनी पुढे सांगितले की, आता सर्व काही न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून असून त्यांना भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. दोषींना कठोर शिक्षा मिळावी हीच आमची आणि संपूर्ण आसाममधील जनतेची अपेक्षा आहे, असेही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री जलदगती न्यायालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न करतील, असे संकेत मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. जुबीन गर्ग यांच्या हत्येप्रकरणी दाखल झालेल्या या आरोपपत्रामुळे आता न्यायप्रक्रिया वेग घेण्याची शक्यता असून, संपूर्ण देशाचे लक्ष या खटल्याकडे लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version