राष्ट्रवादीमध्ये मोठी घडामोड; मुंबई अध्यक्षपदासाठी ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा, पार्थ पवारांचे निकटवर्तीय…

पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींना वेगळं वळण मिळालं होतं.

राष्ट्रवादीमध्ये मोठी घडामोड;  मुंबई अध्यक्षपदासाठी ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा, पार्थ पवारांचे निकटवर्तीय…

राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघटनात्मक हालचालींना आता वेग येताना दिसत आहे. पक्षातील विविध पदांवर नव्या नियुक्त्या होत असतानाच मुंबई अध्यक्षपदासाठीही नाव निश्चित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत पार्थ पवार यांचा प्रभाव वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबई अध्यक्षपदासाठी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असल्याचं समोर येत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचीही शपथ घेतली. या काळात राष्ट्रवादीच्या संघटनात्मक पातळीवरही अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले.

दरम्यान, पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींना वेगळं वळण मिळालं होतं. या यादीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं होती मात्र त्यांच्या नावांसमोर कोणतीही जबाबदारी नमूद करण्यात आली नव्हती. त्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या.

हेही वाचा – Kapil Sibal: एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदावरच प्रश्नचिन्ह? सिब्बलांच्या युक्तिवादाने कोर्टात खळबळ

मुंबई अध्यक्षपद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. समीर भुजबळ यांनी या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा अद्याप भरलेली नाही. आता या पदासाठी आमदार झिशान सिद्दीकी यांचं नाव पुढे आलं आहे. झिशान सिद्दीकी हे पार्थ पवार यांच्या जवळचे मानले जात असल्याने त्यांच्या नियुक्तीमागे पार्थ पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, अशी चर्चा आहे. झिशान सिद्दीकी यांची मुंबई अध्यक्षपदी निवड झाल्यास मुंबईतील राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बांधणीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येणार आहे. त्यामुळे या नियुक्तीकडे पक्षातील तसेच मुंबईतील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number