राज्यात काल नगरपालिका आणि नगरपंचायतींचे निकाल काल लागले. या निवडणूकांमध्ये भाजपने बाजी मारली आहे. या निवडणूकींमध्ये भाजपचे १२९ नगरसेवक निवडून आले आहेत. २७ नगर परिषदांसाठी निवडणूक पार पडली. त्यापैकी २२ ठिकाणी भाजपाने निवडणूक जिंकली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
आपले 210 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. यामुळे या निवडणुकीमध्ये आपण महाविकास आघाडीचा पूर्णपणे सफाया केला आहे, हे देखील याठिकाणी स्पष्ट होतंय. भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर पुन्हा एकदा सर्वात जास्त स्ट्राईक रेट आपला जास्त आहे. राज्यामध्ये भाजपाने एक रेकॉर्ड तयार केला आहे, ते म्हणजे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याचा.
पुढे ते म्हणाले की, "अनेक विरोधकांचे किल्ले उद्ध्वस्तच झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहेत. सगळ्या मोठ्या ठिकाणी आपण उत्तम यश मिळवलं आहे. विरोधकांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त केले आहेत. नगरसेवक, नगराध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे. मी कालपासून अनेक अभिनंदनं स्वीकारतो आहे. त्याचे खरे मानकरी माझ्यासमोर बसलेले तुम्ही आहात. मी त्याचा वाटेकरी आहे मात्र या यशाचे खरे मानकरी तुम्ही सगळे आहात".
नंतर ते म्हणाले की, आपण जिंकलेली सगळी शहरं आणि न जिंकलेल्या शहरांमध्ये आपण चांगलं काम करु आणि परिवर्तन घडवून आणू. जी चांगली सुरुवात झाली आहे त्याचं प्रतिबिंब महापालिका निवडणुकांच्या निकालांमध्येही दिसेल याबाबत मला खात्री आहे. विजयाने मातणार नाही, माजणार नाही हा आपला संकल्प असला पाहिजे.