आता 11 नोव्हेंबर रोजी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यापूर्वी 9 ऑक्टोबर रोजी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप व त्या जागा चक्रानुक्रमे फिरवण्याच्या पद्धतीबाबत नियमावली जाहिर केली होती.
आता राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका निवडणूकांच्या आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रमाबाबत अधिसूचना काढली आहे. वॉर्ड आरक्षण बदलल्यास अनेक वर्ष विकासकामे केलेल्या नगरसेवकांना दुसऱ्या वॉर्डचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यानंतर 14 नोव्हेंबरला प्रारूप प्रसिद्ध होईल
पालिकेच्या 227 जागांपैकी अनुसूचित जाती 15, अनुसूचित जमातीसाठी 2,इतर मागासवर्गीयांसाठी 61 जागा तर उर्वरित जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असतील. यात महिलांसाठी 50 टक्के आरक्षित आहेत याचाच अर्थ जवळपास 114 जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहे.
या सोडतीनंतर मुंबईतील आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या राजकारणाला वेग येणार असून, कोणता वॉर्ड कोणत्या आरक्षणाखाली जाणार हे स्पष्ट होईल. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष, माजी नगरसेवक आणि नव्याने उभे राहणारे उमेदवार यांच्यासाठी ही सोडत अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.