Maharashtra Cow Smuggling Crackdown : गो-तस्करांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई होणार; मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश

मुंबई : राज्या सरकारने गो तस्करीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आज, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गो तस्करीविरोधात मकोका लावण्याचे निर्देश दिले आहेत.राज्यातील गो तस्करी,गो वंशांची बेकायदेशीर वाहतूक आणि अनधिकृत कत्तलखाने रोखण्यासाठी ही कठोर उपाययोजना करण्यात आली आहे. गृह विभागाने जारी केलेल्या एका नवीन आदेशानुसार, गोवंशाच्या संघटित तस्करीमध्ये सहभागी असलेल्या टोळ्या आणि रॅकेट्सविरुद्ध आता […]

Maharashtra Cow Smuggling Crackdown : गो-तस्करांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई होणार; मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश

मुंबई : राज्या सरकारने गो तस्करीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आज, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गो तस्करीविरोधात मकोका लावण्याचे निर्देश दिले आहेत.राज्यातील गो तस्करी,गो वंशांची बेकायदेशीर वाहतूक आणि अनधिकृत कत्तलखाने रोखण्यासाठी ही कठोर उपाययोजना करण्यात आली आहे. गृह विभागाने जारी केलेल्या एका नवीन आदेशानुसार, गोवंशाच्या संघटित तस्करीमध्ये सहभागी असलेल्या टोळ्या आणि रॅकेट्सविरुद्ध आता थेट ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या’ (MCOCA) अंतर्गत गुन्हे दाखल केले जातील. महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या संबंधित अधिकारक्षेत्रात कार्यरत असलेल्या अनधिकृत कत्तलखान्यांची तपासणी करण्याचे आणि त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय, राज्यात कोठेही अनधिकृत कत्तलखाने कार्यरत राहणार नाहीत, याची खात्री करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली.

हेही वाचा :  Maharashtra MLC Election : फॉर्म्युला ठरला! विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा जागावाटपासाठी मेगा प्लॅन; वाचा कोणाला किती जागा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number