राज्य सरकारकडून महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन वाढवण्यासाठी 'लाडकी बहीण योजना' सुरु केली. या कल्याणकारी योजनेद्वारे सर्वसाधारणपणे दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत थेट खात्यावर जमा केली जाते. मात्र, यंदाच्या रक्षाबंधनाचा सण अधिक उत्साहात साजरा व्हावा या हेतूने शासनाने या नियमित रकमेत वाढ करून ती 1,750 रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
'लाडकी बहीण योजने'तील सहभागी महिलांसाठी चालू महिन्यात एका विशेष आनंदाच्या बातमीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच या महिन्याचा हप्ता आणि त्याचसोबत रक्षाबंधननिमित्त ओवाळणी दिली जाणार आहे. येत्या 28 ऑगस्ट 2026 ला देशभरात रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे.
यानिमित्त महाराष्ट्रात राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून 344.74 कोटी रूपये महिला व बालकल्याण विभागाकडे सोपवण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच लाडक्या बहिणींना त्यांचा या महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. रक्षाबंधनाच्या तोंडावर ओवाळणी मिळणार असल्याने लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.