KP Sharma Oli On Nepal Violence: नेपाळमध्ये जनरेशन झेडच्या हिंसक आंदोलनानंतर पदच्युत नेपाळी नेते आणि सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष केपी शर्मा ओली यांनी शनिवारी त्यांच्या पहिल्या सार्वजनिक उपस्थितीत परिस्थितीबाबत स्पष्ट मत व्यक्त केले. ओली यांनी परिस्थिती चिघळण्याची जबाबदारी घुसखोरांवर टाकली. तसेच स्वतःच्या प्रशासनाबाबत कोणताही गैरप्रकार झाल्याचं नाकारलं. ओली म्हणाले, '8 सप्टेंबर रोजी एव्हरेस्ट हॉटेलजवळील बॅरिकेडवर काही घुसखोर गर्दीत मिसळले. परिस्थिती चिघळत असताना तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र घुसखोरांनी हिंसाचार केला, ज्यात किमान 21 तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेची चौकशी सुरू आहे.'
हेही वाचा – India Slams Pakistan : 'पाकच्या पंतप्रधानांची नौटंकी…', UNGA मध्ये भारताचा पाकिस्तानवर हल्लाबोल
ओलींनी फेटाळले आरोप
सुरुवातीला शांततापूर्ण सुरू झालेली जनरेशन झेडची आंदोलने अश्रुधुराचा आणि जिवंत गोळीबाराचा वापर केल्याने हिंसक झाली. प्राप्त माहितीनुसार, नेपाळमध्ये आंदोलनादरम्यान, 8 सप्टेंबरला 21, 9 सप्टेंबरला 39 आणि पुढील दहा दिवसांत 14 जणांचा मृत्यू झाला. तथापी, आतापर्यंत एकूण 74 मृतांची नोंद आहे. तथापी, ओली यांनी आरोप फेटाळून लावले की, प्रशासनाने जिवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठीच कारवाई केली. 'मी 9 सप्टेंबर रोजी सकाळी राजीनामा दिला, जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली होती. परंतु घुसखोरांच्या हस्तक्षेपामुळे हिंसाचार सुरू राहिला,' असंही ओली म्हणाले.
हेही वाचा – Russian Crude Oil Imports: रशियाकडून तेल आयात कमी करण्यास भारत सहमत; पण ट्रम्पसमोर ठेवल्या ‘या’ अटी
घुसखोरांमुळे नेपाळमध्ये हिंसाचार –
ओलीने असेही नमूद केले की, जनरेशन झेड आंदोलकांचा हेतू पारदर्शकता आणि सुधारणांसाठी होता. मात्र, काही बाह्य घटकांनी आणि घुसखोरांनी याचा गैरवापर करून हिंसाचार घडवला. हिंसाचारानंतर ओलींनी राजीनामा दिला आणि हंगामी पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की यांनी जबाबदारी घेतली. दरम्यान, ओलींनी यावेळी माजी पंतप्रधानांच्या परदेश प्रवासावर बंदी घालण्याच्या वृत्तासंदर्भात हंगामी सरकारवर टीका केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.