Saurav Das: ‘कंगनाला तिच्या पक्षातही किंमत नाही’ सीजेपी प्रवक्ते सौरव दास नेमकं काय म्हणाले?

कंगना रणौत यांच्या ‘जनरेशन गटर’ वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. CJP प्रवक्ते सौरव दास यांनी टीका करत तरुण पिढी आणि भाजपकडूनही त्यांना गांभीर्याने घेतले जात नसल्याचा दावा केला.

Saurav Das:  ‘कंगनाला तिच्या पक्षातही किंमत नाही’ सीजेपी प्रवक्ते सौरव दास नेमकं काय म्हणाले?

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांच्या एका वक्तव्यावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली आहे. तरुण पिढीबाबत केलेल्या त्यांच्या ‘जनरेशन गटर’ या टिप्पणीवर आता CJP (Cockroach Janta Party) कडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. CJP चे प्रवक्ते सौरव दास यांनी कंगना यांच्या वक्तव्यावर टीका करत त्यांना लक्ष्य केले आहे. सौरव दास यांनी म्हटले की, कंगना रणौत यांच्या मतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, कारण त्यांच्या मते त्यांच्या स्वतःच्या पक्षातील लोकही त्यांना फारसे महत्त्व देत नाहीत. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी दावा केला की, Gen Z, Gen Alpha आणि तरुण पिढीतील लोकही कंगना यांच्या वक्तव्यांकडे लक्ष देत नाहीत.

कंगना रणौत यांनी यापूर्वी तरुण हिंदू मुलींबाबत केलेल्या टिप्पणीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या या भूमिकेवर अनेक स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या.CJP प्रवक्त्यांनी कंगना यांच्या राजकीय भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. खासदार म्हणून काम करताना जबाबदाऱ्या आणि मेहनत किती मोठी असते, याचा अनुभव त्यांना येत असल्याचे त्यांनी सांगितले. हिमाचल प्रदेशातील त्यांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यांदरम्यान केलेल्या काही वक्तव्यांचा उल्लेख करत त्यांनी कंगनांवर टीका केली.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number