Dasara Melava 2025: आदित्य ठाकरेंचे फोटो सॅनिटरी पॅडवर…; तुम्ही हेच संस्कार दिलेत का? ज्योती वाघमारे यांचा रश्मी ठाकरेंना सवाल

ज्योती वाघमारे यांनी आपल्या सामाजिक कामाचा आणि टीकेला उत्तर देताना सांगितले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला, तरी मला सोशल मिडीयावर ट्रोल केले गेले.
Dasara Melava 2025: आदित्य ठाकरेंचे फोटो सॅनिटरी पॅडवर…; तुम्ही हेच संस्कार दिलेत का? ज्योती वाघमारे यांचा रश्मी ठाकरेंना सवाल

Jyoti Waghmare On Aditya Thackeray: मुंबईतील नेस्को मैदानावर गुरुवारी आयोजित शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी विरोधकांवर कठोर टीका केली. त्यावेळी त्यांनी विशेषतः ठाकरे गटावर निशाणा साधला. ज्योती वाघमारे म्हणाल्या, अतिवृष्टीच्या काळात एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आणि पूरग्रस्तांना मदत केली. मदत साहित्यावर फोटो लावल्यामुळे ठाकरे गटाने टीका केली. आधी शिंदे गटाचे फोटो लावले तरी काही नाही, आता आमचे फोटो लावले की विरोध होतो का? यावेळी वाघमारे यांनी आदित्य ठाकरे यांच्या मुलींना वाटण्यात आलेल्या सॅनिटरी पॅडवरच्या फोटोवरही प्रश्न उपस्थित केला. त्यांनी म्हटलं की, आदित्य ठाकरे तुम्हाला बहीण नाही हे ठाऊक आहे, पण तुमच्या आईने रश्मी वहिनीने मुलाला संस्कार दिलेत का?

ज्योती वाघमारे यांनी आपल्या सामाजिक कामाचा आणि टीकेला उत्तर देताना सांगितले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला, तरी मला सोशल मिडीयावर ट्रोल केले गेले. पण मी फ्लॉवर नाही, फायर आहे. कोणत्याही पदाविनाही मी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत होते. हा हक्क मला संविधानाने दिला आहे, मी दलित मुलगी आहे आणि संविधानाने मला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला आहे.

हेही वाचा – Ramdas Kadam On Uddhav Thackeray : 'बाळासाहेब ठाकरेंचा आधीच मृत्यू, मृतदेह घरात ठेवून…', रामदास कदम यांचा मोठा खुलासा

दरम्यान, ज्योती वाघमारे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं, पेंग्विनला आमदार करायचा होता म्हणून दोन आमदार दयावे लागले. आता तरी काम करा, फक्त पार्ट्या करू नका. मुख्यमंत्री मुलगा किंवा कॅबिनेट मंत्री असल्याने जनतेने जे दिवस दिले आहेत, ते लक्षात ठेवले पाहिजेत.

हेही वाचा – Eknath Shinde Dasara Melava 2025 : 'आम्ही वर्क फ्रॉम होम केलं नाही…', दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

या मेळाव्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांवर कटाक्षाने टीका करत आपले धोरण स्पष्ट केले, तर पक्षाच्या आगामी कृतीसंदर्भातही संकेत दिले गेले. शिंदे गटाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनीही पक्षाच्या आगामी धोरणांवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, आम्ही म्हटलो होतो की, 200 आमदार निवडून येऊ, पण त्यापेक्षा जास्त आले. मुंबईत भाऊ भाऊ मिलेंगे की बिचछेंगे सुरू आहे. ठाकरेंचा पराभव ठाकरेंनी केला, हे जगाने पाहिले. राज ठाकरेंचा मुलगा आजारी असताना उद्धव ठाकरे नगरसेवक फोडले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version