Sangli District Nagar Palika Election: ईश्वरपुरात जयंत पाटलांचा करिश्मा! विरोधकांचा धुव्वा उडवत राखला बालेकिल्ला

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आपला इस्लामपूरचा बालेकिल्ला भक्कमपणे राखला असून, पलूसमध्ये काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
Sangli District Nagar Palika Election: ईश्वरपुरात जयंत पाटलांचा करिश्मा! विरोधकांचा धुव्वा उडवत राखला बालेकिल्ला

Sangli District Nagar Palika Election: सांगली जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आपला ईश्वरपुरचा बालेकिल्ला भक्कमपणे राखला असून, पलूसमध्ये काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. दुसरीकडे, जत आणि आटपाडीमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे.

ईश्वरपूर-आष्ट्यात जयंत पाटलांचा झंझावात

विरोधकांनी कंबर कसली असतानाही जयंत पाटील यांनी उरण-ईश्वरपूर नगरपरिषदेत विरोधकांचा धुव्वा उडवला. नगराध्यक्ष पदासह एकूण 23 जागा जिंकत त्यांनी एकहाती सत्ता मिळवली. महायुती आणि काँग्रेसच्या आघाडीला केवळ 8 जागांवर समाधान मानावे लागले. आष्टा नगरपालिकेतही शरद पवार गटानेच बाजी मारली आहे.

पलूसमध्ये काँग्रेसचा 'पंजा' भारी 

पलूसमध्ये आमदार विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सत्ता राखली आहे. येथे भाजपला केवळ 1 तर अजित पवार गटाला 4 जागा मिळाल्या. शिराळा येथे महायुतीने (शिंदे सेना व भाजप) बाजी मारली आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पृथ्वीसिंग नाईक विजयी झाले असून, महायुतीने 11 जागा जिंकल्या आहेत.

हेही वाचा  – Ratnagiri Election Result 2025: कोकणात महिलाराज..! रत्नागिरीत 4 पैकी 3 नगरपरिषद तर तिन्ही नगरपंचायतीवर महिला नगराध्यक्ष

गोपीचंद पडळकरांचा करिश्मा

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवला आहे. अमरसिंह देशमुख आणि ब्रह्मानंद पडळकर यांच्या साथीने त्यांनी येथे एकहाती सत्ता मिळवली. तसेच जत नगरपरिषदेतही भाजपने विजय मिळवला आहे.

हेही वाचा – Gangakhed Nagar Panchayat Results: धनंजय मुंडेंच्या बहिणीचा विजय; कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष

तासगावमध्ये 'काका' भारी, रोहित पवारांना कडवी झुंज

दरम्यान, तासगाव नगरपरिषदेत माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीने बाजी मारली. त्यांच्या उमेदवार विजया पाटील नगराध्यक्षा झाल्या आहेत. आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने (शरद पवार गट) 11 जागा जिंकून कडवी झुंज दिली. या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि मनसेला एकाही जागेवर नगराध्यक्ष निवडून आणता आलेला नाही. सांगलीत पुन्हा एकदा स्थानिक मातब्बर नेत्यांचेच वर्चस्व असल्याचे अधोरेखित झाले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version