Elon Musk Tesla : 88 लाख कोटी सॅलरीचा प्रस्ताव मंजूर, एलॉन मस्कचं सेलिब्रेशन; रोबोटसोबत भन्नाट डान्स

एलोन मस्क यांच्यासाठी मोठ्या वेतन पॅकेजला मंजुरी दिली आहे, ज्याची किंमत 1 ट्रिलियन डॉलर्स किंवा सुमारे 88 लाख कोटी रुपये असू शकते.

Elon Musk Tesla : 88 लाख कोटी सॅलरीचा प्रस्ताव मंजूर, एलॉन मस्कचं सेलिब्रेशन; रोबोटसोबत भन्नाट डान्स

टेस्लाच्या शेअरहोल्डर्सनी कंपनीचे सीईओ एलोन मस्क यांच्यासाठी मोठ्या वेतन पॅकेजला मंजुरी दिली आहे, ज्याची किंमत 1 ट्रिलियन डॉलर्स किंवा सुमारे 88 लाख कोटी रुपये असू शकते.  गुरुवारी झालेल्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) टेस्लाच्या शेअरहोल्डर्सनी एलोन मस्कसाठी 1 ट्रिलियन डॉलर्स (सुमारे 83 लाख कोटी रुपये) वेतन पॅकेजला मान्यता दिली.

या मतदानात, 75 टक्क्यांहून अधिक गुंतवणूकदारांनी मस्कच्या बाजूने मतदान केले. या निर्णयानंतर, जर मस्कने कंपनीचे निश्चित केलेले वाढीचे लक्ष्य साध्य केले, तर तो जगातील पहिला ट्रिलियनेअर म्हणजेच एक लाख कोटी डॉलर्सची मालमत्ता असलेला व्यक्ती बनेल.

हेही वाचा – Layoffs : कपातीचे वादळ! 2025 मध्ये 1 लाखाहून अधिक नोकऱ्या गेल्या; या क्षेत्रातल्या कामगारांसाठी सर्वाधिक कठीण 'काळ' 

हे पॅकेज टेस्लाच्या कामगिरीशी जोडलेले आहे, ज्यामध्ये कंपनीचे बाजार मूल्य सध्याच्या 1.5 ट्रिलियन डॉलर वरून 8.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवणे समाविष्ट आहे. या घोषणेनंतर आफ्टर-अवर्स ट्रेडिंगमध्ये टेस्लाचे शेअर्स जवळपास 1 टक्क्यांनी वाढले, असे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

निर्णय जाहीर झाल्यानंतर, मस्क म्हणाले, "मी सर्व भागधारकांचे मनापासून आभार मानतो; हे माझ्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे." मस्क रोबोटसोबत आनंदाने नाचताना दिसला.

हेही वाचा – Donald Trump यांचा नवा दावा; 'भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली!' म्हणाले, 'मोदी एक महान व्यक्ती'

टेस्लाचे शेअर्स घसरले : 

सरकारने एलोन मस्कच्या विक्रमी 1 ट्रिलियन डॉलर्सच्या वेतन पॅकेजला मंजुरी दिली. या मंजुरीनंतर टेस्लाचे शेअर्स कोसळले. अमेरिकन शेअर बाजार उघडताच, टेस्लाचे शेअर्स 4.8% घसरून दिवसाच्या नीचांकी पातळीवर 424.48 डॉलरवर पोहोचले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number