Secret of Health of 100 Years Old Indians : 100 वर्षांहून अधिक जगणाऱ्या भारतीयांचे गुपित! महागडी औषधे नव्हे; तर, या साध्या सवयी

दीर्घायुष्याचा थेट संबंध वाईट सवयींपासून दूर राहण्याशी आहे. रिसर्चमध्ये सामील झालेल्या 90 टक्क्यांहून अधिक लोकांनी कधीही दारू (Alcohol) प्यायली नव्हती. शिवाय..
Secret of Health of 100 Years Old Indians : 100 वर्षांहून अधिक जगणाऱ्या भारतीयांचे गुपित! महागडी औषधे नव्हे; तर, या साध्या सवयी

Secret of Health of 100 Years Old Indians : 100 वर्षे जगणे ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. शिवाय, ते जीवन प्रसन्न, आरोग्यमय आणि निरामय असावे आणि एवढ्या मोठ्या जीवनाचा योग्य लाभ घेता यावा, असेही वाटत असते. 2023 च्या अंदाजानुसार, भारतात पुरुषांचे आयुर्मान (Life Expectancy) सरासरी 70 ते 71 वर्षे आणि महिलांचे 73 ते 74 वर्षे सांगितले गेले आहे. परंतु, आपल्या देशातीलच 'ओल्डेस्ट-ओल्ड' (Centenarians) म्हणजेच 100 वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांनी दीर्घायुष्य (Longevity) कसे मिळवता येते, याचे गुपित नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमधून उघड केले आहे.

संशोधनातून काय शिकायला मिळाले?
लॉन्गिट्यूडिनल एजिंग स्टडी ऑफ इंडिया (LASI) च्या डेटाचा वापर करून नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात 100 वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांचे आरोग्य आणि जीवनशैली यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. या अहवालानुसार, दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्याचे रहस्य कोणत्याही महागड्या औषधात किंवा क्लिष्ट विज्ञानात नसून, ते आपल्या आहार आणि जीवनशैलीत दडलेले आहे. या सेंटेनरियन्सचे आरोग्य निर्देशांक पाहून वैज्ञानिकही आश्चर्यचकित झाले आहेत; कारण त्यांच्या आरोग्याचे जे पॅटर्न समोर आले, ते दीर्घायुष्य आणि रोग नसणे (Absence of Diseases) यांचा थेट संबंध असल्याचे दर्शवतात.

आदर्श वजन आणि रोगमुक्तता
या रिसर्चमध्ये समाविष्ट असलेल्या 100 वर्षांवरील लोकांपैकी अर्ध्याहून अधिक (55.5 टक्के) लोकांचा बीएमआय (BMI) म्हणजेच बॉडी मास इंडेक्स सामान्य (Normal) होता, तर 41 टक्के लोक कमी वजनाचे (Underweight) आढळले. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एकही व्यक्ती थुलथुलीत (Overweight) नव्हती. 91 टक्क्यांहून अधिक लोकांची कंबर (Waist Circumference) सामान्य होती, जे त्यांच्या फिट (Fit) आणि चपळ जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करते. ज्या वयात लोक संधिवात, मधुमेह (Diabetes) आणि हृदयाच्या (Heart Disease) आजारांनी त्रस्त असतात, त्या वयात या लोकांध्ये हाय कोलेस्ट्रॉल, स्ट्रोक किंवा गंभीर हृदयविकाराचा एकही रुग्ण आढळला नाही. मधुमेह असलेल्यांची संख्या फक्त 1.7 टक्के होती.

हेही वाचा – IVF Success in Old Age : वयाच्या 70 व्या वर्षी IVF ने मातृत्वाची अनुभूती! जास्त वयाच्या महिलांसाठी 'आयव्हीएफ' ठरतंय वरदान?

वाईट सवयींपासून पूर्णपणे अंतर
दीर्घायुष्याचा थेट संबंध वाईट सवयींपासून दूर राहण्याशी आहे. रिसर्चमध्ये सामील झालेल्या 90 टक्क्यांहून अधिक लोकांनी कधीही दारू (Alcohol) प्यायली नव्हती, तर सुमारे 68 टक्क्यांहून अधिक लोकांनी कधीही तंबाखूचे (Tobacco) सेवन केले नव्हते. या निकालांमुळे आरोग्य तज्ज्ञांना आता सार्वजनिक आरोग्य चर्चेची दिशा बदलावी लागणार आहे, हे मान्य करावे लागले आहे.

आरोग्य तज्ज्ञांची महत्त्वपूर्ण शिकवण
डॉक्टर्स आणि एक्सपर्ट्सनी विशेषतः शहरी भागात राहणाऱ्या तरुणांना आणि वृद्धांना आरोग्यदायी आहार आणि सक्रिय जीवनशैली स्वीकारण्यासाठी जागरूक करण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य धोरणांनी आता फक्त औषधांवर लक्ष केंद्रित न करता, वर्तणूक बदलांवर (Behavioural Changes) अधिक जोर दिला पाहिजे. यासाठी कमी फॅट खाणे, साखर आणि मीठ नियंत्रणात ठेवणे आणि तंबाखू व दारूपासून दूर राहणे आवश्यक आहे. तसेच, सातत्याने आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे. हा रिसर्च सांगतो की 'दीर्घायुष्य' हा चमत्कार नसून, कष्टाने मिळवलेली एक सवय (Habit) आहे.

हेही वाचा – Anti-Aging Medicine : माणूस आता 150 वर्ष जगणार? चीनच्या संशोधकांचे वार्धक्य रोखणारे मोठे संशोधन

(Disclaimer : ही माहिती संशोधनावर आधारित असून केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version