Nashik Municipal Election: नाशिकमध्ये उद्धव अन् राज ठाकरे 20 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावरून तोफ डागणार; ‘या’ दिवशी रणशिंग फुंकणार

तब्बल दोन दशकांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावरून जनतेला संबोधित करणार असल्याने, या सभेने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.<br/>
Nashik Municipal Election: नाशिकमध्ये उद्धव अन् राज ठाकरे 20 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावरून तोफ डागणार; ‘या’ दिवशी रणशिंग फुंकणार

Nashik Municipal Election: राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि बहुप्रतिक्षित युती अखेर नाशिकच्या मैदानात पाहायला मिळणार आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांनी हातमिळवणी केली असून, 9 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त जाहीर सभा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली आहे. तब्बल दोन दशकांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावरून जनतेला संबोधित करणार असल्याने, या सभेने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर धडाडणार तोफ

नाशिकमधील ऐतिहासिक हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर ही महासभा पार पडणार आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाने या मैदानासाठी महापालिकेकडे अधिकृत परवानगी मागितली असून, प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. 3 ते 13 जानेवारी दरम्यान मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये होणाऱ्या संयुक्त दौऱ्याचा एक भाग म्हणून 9 जानेवारीची तारीख नाशिकसाठी निश्चित करण्यात आली आहे. पक्षातील फाटाफुटीनंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच संयुक्तपणे प्रचारात उतरत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Balasaheb Sarwade Death Case: 'माझे पप्पा मला सोडून गेले…'; चिमुकलीची आर्त हाक ऐकून अमित ठाकरेंना रडू कोसळलं, पहा व्हिडिओ

आदित्य आणि अमित ठाकरेंचा 'रोड शो' ठरणार मुख्य आकर्षण

केवळ वडीलच नाही, तर ठाकरे घराण्याची पुढची पिढी म्हणजेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे देखील नाशिकच्या रस्त्यावर एकत्र उतरणार आहेत. मुंबईच्या धर्तीवर नाशिकमध्येही या दोन्ही युवा नेत्यांचा भव्य 'रोड शो' आयोजित करण्याचे नियोजन सुरू आहे. दोन तरुण नेते एकत्र आल्याने नाशिकच्या तरुण मतदारांना आकर्षित करण्यात ही जोडी यशस्वी ठरेल, असा विश्वास दोन्ही पक्षांच्या गोटातून व्यक्त होत आहे.

हेही वाचा  – BMC Election 2026 : मुंबई कुणाची? नव्या सर्व्हेने धाकधूक वाढवली; अमराठी मतांच्या बळावर महायुती 'किंगमेकर' ठरणार?

सभेचे राजकीय महत्त्व

गेल्या काही दिवसांत नाशिकमधील अनेक माजी नगरसेवकांनी पक्ष सोडून इतरत्र स्थलांतर केले आहे. या पार्श्वभूमीवर, उद्धव आणि राज ठाकरेंची एकत्र येणारी तोफ कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकण्याचे काम करेल. तथापी, विखुरलेली मराठी मते एकत्र करण्यासाठी ही युती 'मास्टरस्ट्रोक' मानली जात आहे. या सभेतून दोन्ही बंधू सत्ताधाऱ्यांवर काय प्रहार करतात आणि कोणता नवा राजकीय संदेश देतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version