BMC Election 2026: मागाठाण्यात एका जागेसाठी 5 तास खलबत! एकीकडे घराणेशाहीचा जोर; दुसरीकडे निष्ठावंतांच्या अपेक्षांवर पाणी

जागावाटप होताना 'मागाठाणे' विधानसभा क्षेत्रातील एका जागेसाठी तब्बल 5 तास खलबते चालली. आमदारांच्या आपल्या नातेवाईकांसाठी असलेल्या हट्टामुळे दोन निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पदरी मात्र निराशा आली आहे.<br/>
BMC Election 2026: मागाठाण्यात एका जागेसाठी 5 तास खलबत! एकीकडे घराणेशाहीचा जोर; दुसरीकडे निष्ठावंतांच्या अपेक्षांवर पाणी

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अखेरच्या काही तासांत 137 (भाजप) आणि 60 (शिंदेसेना) अशा फॉर्म्युल्यावर निश्चित झाले. मात्र, हे जागावाटप होताना 'मागाठाणे' विधानसभा क्षेत्रातील एका जागेसाठी तब्बल 5 तास खलबते चालली. आमदारांच्या आपल्या नातेवाईकांसाठी असलेल्या हट्टामुळे दोन निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पदरी मात्र निराशा आली आहे.

सुर्वे विरुद्ध दरेकर संघर्षात 'राज'गादी कोणाला?

मागाठाण्याचे शिंदेसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी आपला मुलगा राज सुर्वे याला प्रभाग क्रमांक 5 मधून उतरवण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. दुसरीकडे, भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर हे आपले बंधू प्रकाश दरेकर यांच्यासाठी याच जागेसाठी आग्रही होते. या 'पुत्र' विरुद्ध 'बंधू' लढाईत अखेर आमदार सुर्वे यांनी बाजी मारली आणि ही जागा शिंदेसेनेच्या वाट्याला गेली.

हेही वाचा – BMC Election : वाजत-गाजत, शक्तीप्रदर्शनासह मंगेश पांगारे यांनी दाखल केला स्वतंत्र उमेदवारी अर्ज; शिवसेनेने संजय घाडी यांना उमेदवारी दिल्यानं पांगारे नाराज

संजय घाडी आणि पांगारे यांची राजकीय कोंडी

या कौटुंबिक ओढाताणीत उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत आलेले माजी नगरसेवक संजय घाडी यांचा मोठा गेम झाला आहे. प्रभाग 5 मधून जोरदार तयारी करणाऱ्या संजय घाडींना नाईलाजाने प्रभाग 4 मध्ये जावे लागले आहे. घाडी प्रभाग 4 मध्ये आल्यामुळे तिथे आधीपासून तयारी करत असलेले शिंदेसेनेचे उपविभागप्रमुख मंगेश पांगारे यांची संधी हुकली आहे. ठाकरेंची साथ सोडताना त्यांना प्रभाग 4 चा शब्द देण्यात आला होता, जो आता पाळला गेला नाही.

हेही वाचा – PMC Election: अजित पवारांना गुन्हेगारीमुक्तीच्या दाव्याचा विसर? मारणेनंतर आता आंदेकर टोळीच्या दोन महिलांना राष्ट्रवादीचे तिकीट

भाजपमध्येही 'बंधू' प्रेमाचा फटका; बाळकृष्ण ब्रीद यांचा पत्ता कट

दरम्यान, प्रभाग 5 शिंदेसेनेला सुटल्याने प्रवीण दरेकर यांनी आपले बंधू प्रकाश दरेकर यांना प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी मिळवून दिली. मात्र, यामुळे तिथे प्रबळ दावेदार असलेले शिंदेसेनेचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांचा पत्ता कट झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version