SC Guidelines Comedians: समय रैनाला सर्वोच्च न्यायालयाने लावलं कामाला, दिव्यांग व्यक्तींसाठी करावं लागणार ‘हे’ खास काम

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की, न्यायालयाचा उद्देश दंडात्मक नाही तर सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढवणे आहे.
SC Guidelines Comedians: समय रैनाला सर्वोच्च न्यायालयाने लावलं कामाला, दिव्यांग व्यक्तींसाठी करावं लागणार ‘हे’ खास काम

SC Guidelines Comedians: सर्वोच्च न्यायालयाने युट्यूबर आणि विनोदी कलाकार समय रैना आणि इतर तीन कलाकारांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने सांगितले की, त्यांना त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिव्यांग व्यक्तींच्या यशोगाथांवर आधारित कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमांद्वारे जमा होणारा निधी अपंग व्यक्तींच्या प्रभावी उपचारांसाठी वापरला जाईल. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की, न्यायालयाचा उद्देश दंडात्मक नाही तर सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढवणे आहे. न्यायालयाने म्हटलं की, 'जर तुम्ही लोकप्रिय आहात, तर तुमच्या प्रभावाचा उपयोग समाजासाठी करा.'

हेही वाचा – Viral Video: 'जर ऐश्वर्या रायचा घटस्फोट झाला तर मी तिच्याशी लग्न करेन ';हे काय बोलून गेले पाकिस्तानचे धर्मगुरू?

ही कारवाई क्युअर एसएमए फाउंडेशनच्या याचिकेनंतर करण्यात आली आहे, ज्यात अपंग व्यक्तींबद्दल असंवेदनशील किंवा अश्लील टिप्पण्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा नाही, परंतु विकृत किंवा आक्षेपार्ह सामग्रीला परवानगी देणे शक्य नाही.

हेही वाचा – Hema Malini's Emotional Tribute To Dharmendra: धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी पहिल्यांदाच झाल्या व्यक्त , म्हणाल्या, 'ते माझ्यासाठी सर्वकाही…'

महिन्याला किमान दोन कार्यक्रम आयोजित 

न्यायालयाने समय रैना आणि इतर कलाकारांना दर महिन्याला किमान दोन कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. या कार्यक्रमांद्वारे समाजात सकारात्मक, आदरयुक्त संदेश पोहोचवणे आणि अपंग व्यक्तींच्या उपचारांसाठी निधी गोळा करणे अनिवार्य असणार आहे. तथापी, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, या कार्यक्रमांचा उद्देश शिक्षा देणे नाही, तर समाजात संवेदनशीलता वाढवणे आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी पुढील वर्षी होणार आहे.  पुढील सुनावणीत न्यायालय रैनाला काय आदेश देते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version