Bangladesh Hindu Man Killed by Mob: बांगलादेशमध्ये पुन्हा अमानवीय कृत्य! हिंदू तरुणाला संपवलं नंतर मृतदेह झाडाला बांधून पेटवला

मृत तरुणावर जमावाने ईशनिंदेचा खोटा आरोप केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आंदोलक आणि स्थानिकांच्या एका मोठ्या घोळक्याने त्याला केलेल्या बेदम मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला.
Bangladesh Hindu Man Killed by Mob: बांगलादेशमध्ये पुन्हा अमानवीय कृत्य! हिंदू तरुणाला संपवलं नंतर मृतदेह झाडाला बांधून पेटवला

Bangladesh Hindu Man Mob Lynching : बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू समुदायाला लक्ष्य करण्याचे सत्र थांबताना दिसत नाहीये. मिमेनसिंग शहरातील भालुका परिसरात गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास एका हिंदू तरुणाची जमावाकडून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. दिपू चंद्र दास (वय 30) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, ते एका स्थानिक कापड कारखान्यात कामाला होते. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही संताप व्यक्त केला जात आहे.

ईशनिंदेचा आरोप आणि जमावाचा हिंसाचार
दिपू चंद्र दास यांच्यावर जमावाने ईशनिंदेचा खोटा आरोप केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आंदोलक आणि स्थानिकांच्या एका मोठ्या घोळक्याने दास यांना त्यांच्या भाड्याच्या घराबाहेर पकडले. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. इतक्यावरच न थांबता, संतप्त जमावाने त्यांचा मृतदेह एका झाडाला बांधला आणि सर्वांसमोर पेटवून दिला. 'बीबीसी बांगला'ने या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

युवा नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचाराचा वणवा
बांगलादेशमध्ये 'इन्कलाब मंच'चे युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर हिंसाचाराने उग्र रूप धारण केले आहे. हादी यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि तोडफोड सुरू केली आहे. या आंदोलनाचा रोख केवळ सरकारविरोधी नसून, अल्पसंख्याक आणि माध्यमांवरही आहे. आंदोलकांनी 'प्रोथोम अलो' आणि 'डेली स्टार' या नामांकित वृत्तपत्रांच्या कार्यालयांना आग लावली, ज्यामुळे माहितीचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे.

हेही वाचा – Pakistani Beggars Deports: जगात नाचक्की! 'धुरंधर'वर बंदी घालणाऱ्या देशाने 24 हजार पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलवले

शेख हसीना आणि आवामी लीगच्या मालमत्तांवर हल्ले
आंदोलकांनी माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या आवामी लीग पक्षाशी संबंधित असलेल्या मालमत्तांना प्रामुख्याने लक्ष्य केले आहे. हसीना यांच्या खाजगी मालमत्तांवर दगडफेक करण्यात आली असून, भारतीय दूतावासाच्या कार्यालयांवरही आंदोलकांनी मोर्चा काढल्याचे समोर आले आहे. ढाका आणि आसपासच्या परिसरात परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की, सुरक्षारक्षक हतबल झाले असून आंदोलक उघडपणे घोषणाबाजी करत हिंसाचार पसरवत आहेत.

पोलिसांची भूमिका आणि कायदेशीर प्रक्रिया
भालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी मिया यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र, अद्याप या हत्येप्रकरणी कोणताही अधिकृत गुन्हा दाखल झालेला नाही. पोलीस सध्या दिपू चंद्र दास यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. जर नातेवाईकांनी पुढे येऊन रीतसर तक्रार दिली, तरच कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे विचित्र स्पष्टीकरण पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहे, ज्यामुळे संताप व्यक्त होत आहे. खरे तर, पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याच्या दृष्टीने या प्रकरणी स्यू-मोटो कारवाई (sue moto action) करणे आवश्यक होते. मात्र, पोलिसांची भूमिका दुर्लक्ष करण्याचीच दिसत आहे.

हेही वाचा – Violence In Bangladesh: बांगलादेशामध्ये कायदा-सुव्यवस्था कोलमडली; हादीच्या मृत्यूनंतर हिंसक उद्रेक

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version