‘त्या’ तरुणाचा हिंदू महासभा करणार सत्कार!

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाबाहेर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांसमोरच एका माथेफिरूने गोळीबार केला. या गोळीबारात एका जण जखमी झाला आहे. आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र हिंदू महासभेकडून मात्र या तरुणाचा सत्कार केला जाणार आहे. हिंदू महासभेच्या प्रवक्त्यांचं धक्कादायक वक्तव्य “हा तरुण नथुराम गोडसेंप्रमाणे खरा देशभक्त आहे.” असं वक्तव्य हिंदू महासभेचे प्रवक्ते […]

‘त्या’ तरुणाचा हिंदू महासभा करणार सत्कार!

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाबाहेर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांसमोरच एका माथेफिरूने गोळीबार केला. या गोळीबारात एका जण जखमी झाला आहे. आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र हिंदू महासभेकडून मात्र या तरुणाचा सत्कार केला जाणार आहे.

हिंदू महासभेच्या प्रवक्त्यांचं धक्कादायक वक्तव्य

“हा तरुण नथुराम गोडसेंप्रमाणे खरा देशभक्त आहे.” असं वक्तव्य हिंदू महासभेचे प्रवक्ते अशोक पांडे यांनी केलंय. एवढंचत नव्हे, तर शरजिल इमाम (Sharjeel Imam), शाहीन बाग, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), अलिगढ़ मुस्लिम युनिव्हर्सिटी (AMU) येथील देशद्रोह्यांनाही गोळ्या घातल्या पाहिजेत, असंही त्यांनी म्हटलं.

संबंधित बातमी- जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठानजीक गोळीबार, विद्यार्थी जखमी

गोळीबार करणाऱ्या तरुणाचा आम्हाला अभिमान आहे.

देशद्रोह्यांना जी आज़ादी द्यायला हवी, तीच आज़ादी देण्याचा प्रयत्न या तरुणाने केलाय.

निव्वळ हत्या आणि देशहितासाठी केलेली हत्या यांत फरक असतो. देशासाठी हिंसा करणाऱ्यांसाठी वेगळा कायदा असतो, असं त्यांनी म्हटलंय

या तरुणाला गोळीबार प्रकरणी लागणारी सर्व कायदेशीर मदत हिंदू महासभा करेल, असं पांडे यांनी म्हटलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number