Mysterious Virus Outbreak: उच्च ताप, अंगावर लाल डाग… त्वचा सोलणाऱ्या गूढ विषाणूमुळे हाहाकार

धक्कादायक बाब म्हणजे, ज्या देशात ही साथ पसरली आहे, तिथे मृत्यूचे तांडव सुरू असूनही सरकार मृतांचे खरे आकडे जगापासून लपवत असल्याचा खळबळजनक आरोप होत आहे.
Mysterious Virus Outbreak: उच्च ताप, अंगावर लाल डाग… त्वचा सोलणाऱ्या गूढ विषाणूमुळे हाहाकार

Mysterious Virus Outbreak: सध्या जगावरचं कोरोना व्हायरसचं संकट टळलं आहे. परंतु, पुन्हा एका गुढ विषाणूमुळे जगभरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या विषाणूने संपूर्ण आरोग्य यंत्रणेला गुडघ्यावर टेकवले आहे. या देशात एक असा 'मिस्ट्री व्हायरस' पसरला आहे ज्याची लक्षणं पाहून डॉक्टरही चक्रावून गेले आहेत. अंगावर उमटणारे रक्तासारखे लाल ठिपके, सोलली जाणारी त्वचा आणि सांध्यांना येणारी असह्य सूज यामुळे हजारो लोक तडफडत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या देशात ही साथ पसरली आहे, तिथे मृत्यूचे तांडव सुरू असूनही सरकार मृतांचे खरे आकडे जगापासून लपवत असल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. हा देश दुसरा तिसरा कोणी नसून क्युबा आहे. क्युबामध्ये सध्या या गूढ विषाणूने कहर केला आहे.  

दरम्यान, क्युबामध्ये एका रहस्यमय विषाणूने थैमान घातले असून संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी होत असून आरोग्य व्यवस्था कोलमडण्याच्या उंबरठ्यावर आहे. रुग्णांमध्ये उच्च ताप, अंगावर लाल डाग पडणे, त्वचा सोलणे, सांधेदुखी, उलट्या आणि अतिसार यांसारखी गंभीर लक्षणे दिसून येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, आतापर्यंत या विषाणूचे नेमके कारण डॉक्टरांना शोधता आलेले नाही. ब्रिटिश मेडिकल जर्नलने या परिस्थितीचे वर्णन अलिकडच्या दशकातील सर्वात गंभीर संकट म्हणून केले आहे.

हेही वाचा – Nobel Peace Prize: व्हेनेझुएलावर हल्ल्यानंतरही ट्रम्प यांची शांतता पुरस्काराची इच्छा कायम; मारिया मचाडो यांचीही तयारी, पण नोबेल समितीने स्पष्टच सांगितले..

सरकारकडून आकडेवारी लपवल्याचा दावा 

क्युबातील कम्युनिस्ट सरकार या आजारामुळे होणारे मृत्यू लपवत असल्याचा गंभीर आरोप मानवाधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार 38,000 लोकांना लागण झाली असून 52 मृत्यू झाले आहेत, मात्र प्रत्यक्ष संख्या यापेक्षा कितीतरी जास्त असल्याचा दावा केला जात आहे. 'द सन'च्या अहवालानुसार, मृतांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर विषाणूचा उल्लेख न करता 'नैसर्गिक मृत्यू' अशी नोंद केली जात आहे. अनेक शहरांमधील स्मशानभूमी मृतांच्या गर्दीमुळे भरून गेल्याचे चित्र आहे. हा संसर्ग डेंग्यू, चिकनगुनिया आणि कोविड-19 यांसारख्या अनेक विषाणूंचे एकत्रित रूप असू शकते, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Social Media Law: भारत सरकारच्या एका पत्रानं 'X' हादरलं, आता 'या' नियमाचे पालन करणे अनिवार्य

आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ; कॅनडाकडून क्वारंटाइन लागू 

या गूढ विषाणूचा धोका लक्षात घेता कॅनडा सरकारने क्युबाहून परतणाऱ्या नागरिकांसाठी सात दिवसांचे अनिवार्य क्वारंटाइन आणि आरोग्य तपासणी जाहीर केली आहे. तसेच स्पेननेही आपल्या नागरिकांना क्युबा प्रवासाबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. अमेरिकेच्या 'सीडीसी'ने (CDC) या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. क्युबामध्ये सध्या औषधांचा मोठा तुटवडा जाणवत असून, 'आम्ही मरत आहोत असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही,' अशी आर्त हाक तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version