Jayant Patil : गोपीचंद पडळकरांमुळे देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांच्यात अबोला?, भेट घेणं टाळलं?; व्यासपीठावरील चित्र बोलकं

यावेळी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेणं टाळलं. यावेळी ते स्टेजवर एका बाजूला खूर्चीवर बसलेले दिसले. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमात आपली जागा न सोडता आपला अबोला कायम ठेवला
Jayant Patil : गोपीचंद पडळकरांमुळे देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांच्यात अबोला?, भेट घेणं टाळलं?; व्यासपीठावरील चित्र बोलकं

Sangli News: आज सांगलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जयंत पाटील देखील उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेणं टाळलं. यावेळी ते स्टेजवर एका बाजूला खूर्चीवर बसलेले दिसले. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमात आपली जागा न सोडता आपला अबोला कायम ठेवला. या कार्यक्रमात भाजप आमदार गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते. पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे आज पडळकर स्टेजवर असल्याने जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेणं टाळलं का? असा सवाल आता अनेकांना पडला आहे.  

हेही वाचा – Aditya Thackeray On BJP: ‘भाजप म्हणजे बिल्डर जनता पार्टी…’; पागडी इमारतींच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका

दरम्यान, या सोहळ्याच्या पूर्वतयारीची पाहणी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली. यावेळी आमदार सुरेश खाडे, भाजप नेत्या जयश्री पाटील, नीता केळकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा लोकार्पण समितीचे अध्यक्ष मनगू सरगर, उपाध्यक्ष संतोष पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.  

हेही वाचा – Tejasvi Ghosalkar: ‘शिवसेनेने मला ओळख दिली, पण अभिषेकला न्याय मिळवून देण्यासाठी…’; भाजपात प्रवेश केल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांची प्रतिक्रिया

गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती देशभर विविध उपक्रमांनी साजरी झाली. अहिल्यादेवी यांचा विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध कार्यक्रम राबवले. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहिल्यादेवी यांच्या विचाराने राजकारण, समाजकारण करत आहेत. सर्व घटकांचा विकास साधत आहेत. त्यामुळे सांगली महापालिकेनेही अहिल्यादेवी यांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे.  
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version