Laxman Hake PC : गोपीनाथ मुंडे, बाळासाहेबांचं कौतुक, ओबीसी नेत्यांवर आगपाखड; लक्ष्मण हाके काय म्हणाले?

बीडमधून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचं कौतुक केलं आहे.

Laxman Hake PC : गोपीनाथ मुंडे, बाळासाहेबांचं कौतुक, ओबीसी नेत्यांवर आगपाखड; लक्ष्मण हाके काय म्हणाले?

बीडमधून बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब यांच्यासारखा जनतेला साद घालणारा एकही नेता जन्माला आलेला नाही. यावेळी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंढे यांच्यासारखा जनसामान्यांच्या मनावर पकड असणारा नेता जन्माला आला नाही. असं म्हणत ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांनी गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेबांचं कौतुक केलं आहे. तसेच सध्याच्या राजकारणात ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणाऱ्या नेत्यांची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं.

यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले की, "महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारा नेता अपवाद बाळासाहेबांना सोडलं तर महाराष्ट्राच्या जनतेला साद घालणारा एकही नेता जन्माला आलेला नाही, हे ओबीसींच दुर्दैव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच समतेचं तत्व, सामाजिक न्यायाचं तत्व पुढे घेऊन जाणारा एकही पुरोगामीनेता, वास्तव आणि परखडपणे भूमिका मांडणारा नेता महाराष्ट्रात जन्माला आलेला नाही, हे आमचं दुर्दैव. अपवादात्मक परिस्थितीमध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंढेंनी व्हीजेएनटी आणि ओबीसींमध्ये जी एकजुटीची भावना या राज्यात निर्माण केली. तेवढा वकूब असणारा जनसामान्यांच्या मनावर पकड असणारा नेता जन्माला आला नाही." 

हेही वाचा- CM Devendra Fadnavis : आता अंतिम निर्णय फडणवीसांचा! मंत्र्यांच्या निर्णयांना ब्रेक लावण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे; नव्या GR ने नेमकं काय बदललं?

तसेच पुढे ते म्हणाले की,"एक तारखेला आम्ही मुंबईला निघणार काहीही झाले तरी. ओबीसीच्या बाजूने मुख्यमंत्री ओबीसीचे नेते कोणीच बोलत नाही. ओबीसी मंत्र्यांनो तुम्ही बोलतो व्हा. मुख्यमंत्र्यांनी सांगावं कसं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही आम्ही सांगतो कसा लागला आहे ते. पंचायत राजमध्ये ओबीसीचे प्रमाणपत्र काढून मराठ्यांनी जागा हडप केल्या." 

"विखे पाटलांच्या घरात ओबीसी चे प्रमाणपत्र काढून पद लाटलं जातं. फक्त ओबीसीच्या नेत्यांनाच राजकारणाचं पडलं नाही तर भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना सर्वांनाच राजकारणात ओबीसी पाहिजे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद शिंदेंची पत्नी घेत असेल तर ओबीसी आरक्षण कसं टिकलंत सांगा मुख्यमंत्री साहेब. सर्व समाजाच्या नेत्यांना आवाहन असेल आमच्या सोबत मुंबईला चला. आमचा आणि जरांगे पाटलांचा बांधाला बांध आहे का? पण त्यांची मागणी कायद्याला धरून नाही. मनोज जरांगेंनी छगन भुजबळ, मुख्यमंत्री फडणवीस, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांना टार्गेट केलं."

"नवनाथ वाघमारे यांच्या नाराजीवर म्हणाले की, आमच्यात दोन गट नाही, काल मला लवकर जायचं होतं म्हणून अगोदर भाषण करून निघून गेलो. मानपान या गोष्टीमध्ये पडू नका तुमचे ऑलरेडी कपडे काढून घेतलेले आहेत. संजय राऊत तुम्हाला ओबीसीचे आरक्षण गेलं आहे हे मान्य आहे की नाही ते सांगा. आज आम्ही जात्यात आहोत आणि एससी एसटी सुपात आहे."

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number