दिल्लीत बुधवारी पेट्रोलनं शंभरी पार केली आहे. बुधवारी पेट्रोलच्या दरात ३५ पैसे तर डिझेलच्या दरात १७ पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत बुधवारी पेट्रोल १०० रुपये २१ पैसे प्रति लिटर, तर डिझेल ८९.५३ रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. यापूर्वी सोमवारी पेट्रोल ३५ पैशांनी महाग झालं होतं.
सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. बुधवारी डिझेलच्या दरात १३ ते १८ पैशांनी वाढ झाली आहे, तर पेट्रोलच्या किंमतीत ३३ ते ३५ पैशांनी वाढलं आहे. मुंबईत पेट्रोलने १०६ रुपयांहून अधिकचा आकडा गाठला आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर १०६.२५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९७.०९ रुपये आहे. तर दिल्लीत हा दर १००.२१ रुपये तर डिझेलचा दर ८९.५३ रुपये प्रती लीटर आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरुच आहे. १ मे रोजी पेट्रोलचे दर ९०.४० रुपये प्रति लिटर इतका होता. तर आज पेट्रोल १०० रुपये २१पैसे प्रति लिटरनं विकलं जात आहे. गेल्या ६८ दिवसांत ९.८१ रुपेयांनी पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे. तर डिझेलची किंमत गेल्या दोन महिन्यांपासून ८.८० रुपये प्रति लिटरनं वाढली आहे. मे आणि जून दरम्यान ६१ दिवसांत ३२ दिवशी इंधनाच्या दरात वाढ झाली आहे.