पुण्यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू

पुण्यात इंजिनिअरिंगच्या  विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू

पुण्यात कॉलेज विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत विद्यार्थ्याचं महेश रमेश शेंडगे (२२) असं नाव आहे.

मृत पावलेला हा तरुण पुण्यातील K J इन्स्टिट्यूट ऑफ कॉलेजमध्ये डिप्लोमाचं शिक्षण घेत होता.

पुण्यातील पुरंदरमधील अमराई तलावात या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.

डिप्लोमाची परीक्षा दिल्यानंतर महेश आपल्या ७-८ मित्रांसोबत पोहण्यासाठी आमराई तलावावर गेला होता. यावेळी हा अपप्रकार घडला.

मंगळवारी ३ मार्चला दुपारी ३ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.

मृत पावलेला महेश मूळचा दौंड तालुक्यातील मलठन या गावचा आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version