शिवसेना ठाकरे गटाचे आमदार गळाला लावण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरू होणार असल्याची चर्चा सुरु असतानाच मुंबईत मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेत तब्बल 79 नगरसेवकांच्या निवडीविरोधात न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने निवडणूक याचिका दाखल झाल्याने आगामी काळात न्यायालयीन निर्णयांचा महापालिकेच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार, मतमोजणीतील आक्षेप, उमेदवारी अर्जांबाबतचे वाद तसेच निवडणूक नियमांचे उल्लंघन अशा विविध मुद्द्यांवरून या याचिका दाखल करण्यात आल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे. या प्रकरणांपैकी अनेक याचिका सध्या न्यायप्रविष्ट असून काही प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे.
यामध्ये ठाकरे गटाच्या 16 नगरसेवकांवर टांगती तलवार असून त्यातच ठाकरेंचे नगरसेवक विशाखा राऊत यांचे पद रद्द होणार असल्याची आज महापालिका सभागृहात घोषणा होणार आहे. तर दुसरीकडे दीपक सावंत यांचे पद रद्द करण्यात आले आहे. दोन पद रद्द झाल्यानंतर आता आणखी 16 नगरसेवकांची पदे रद्द होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आगामी सुनावण्यांकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कोणत्या नगरसेवकांचं पद धोक्यात ?
प्रभाग क्रमांक – 121
प्रतिमा शैलेश खोपडे (शिंदे सेना) vs प्रियदर्शिनी ठाकरे (UBT) विजयी
प्रभाग क्रमांक- 62
राजू पेडणेकर (शिंदेसेना) vs झिशान मुल्तानी (UBT) विजयी (स्वतःविषयी खोटी माहिती दिल्याचा आरोप तसंच एबी फॉर्मवर खोटी सही)
प्रभाग क्रमांक – 93
सुमित वाजळे (शिंदेसेना) vs रोहिणी कांबळे (UBT) विजयी
प्रभाग क्रमांक – 12
सुवर्णा गावस (शिंदेसेना) vs सारिका झोरे (UBT) विजयी
प्रभाग क्रमांक – 73
दीप्ती पोतनीस (शिदेसेना) vs लोना रावत (UBT) विजयी (संपत्ती लपवल्याचा आरोप)
प्रभाग क्रमांक – 120
राजराजेश्वरी रेडकर (शिंदेसेना) vs विश्वास शिंदे (UBT) विजयी
प्रभाग क्रमाक – 206
संजय (नाना) आंबोले (शिंदेसेना) vs सचिन पडवळ (UBT) विजयी (मतमोजणी वेळी निवडणूक अधिकाऱ्यासोबत संगनमत केल्याचा आरोप)
प्रभाग क्रमाक – 203
समिधा भोळेकर (शिदेसेना) vs भारती पेडणेकर (UBT) विजयी (मतमोजणी वेळी निवडणूक अधिकाऱ्यासोबत संगनमत केल्याचा आरोप)
प्रभाग क्रमाक – 77
प्रियांका आंबोलकर (शिंदेसेना) vs शिवानी परब (UBT) विजयी
प्रभाग क्रमांक – 89
राजेश नाईक (शिदेसेना) vs गीतेश राऊत (UBT) विजयी
प्रभाग क्रमाक – 208
विजय लिपारे (शिंदेसेना) vs रमाकांत रहाटे (UBT) विजयी (संपत्ती लपवली असा आरोप)
प्रभाग क्रमांक – 198
वंदना गवळी (शिंदेसेना) vs अबोली खाड्ये (UBT) विजयी (शिक्षण तसंच गुन्हे लपवल्याचा आरोप)
प्रभाग क्रमाक – 41
मानसी पाटील (शिंदेसेना) vs सुहास वाडकर (UBT) विजयी
प्रभाग क्रमांक – 94
पल्लवी पै (शिंदेसेना) vs प्रज्ञा भुतकर (UBT) विजयी
प्रभाग क्रमांक 53
अशोक खंडवे (शिंदेसेना) vs जितेंद्र वाळवी (शिवसेना UBT) विजयी
प्रभाग क्रमांक – 187
शेख वकील सागीर अहमद (शिंदेसेना) vs जोसेफ कोळी (UBT) विजयी