Shivsena Shinde On Ritu Tawade : "प्रशासनाने जनभावनेचा विचार करणे आवश्यक" महापौरांच्या वाढत्या खर्चावरुन मित्रपक्ष शिंदेसेनेचाही महापौरांना टोला

महापौरांच्या वाढत्या खर्चावरुन मित्रपक्ष शिवसेनेचाही महापौरांना टोला लगावला आहे. मुंबईच्या महापौरांच्या सोशल मिडीयासाठी 25 लाखांच्या खर्चाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी  शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून कर

Shivsena Shinde On Ritu Tawade : &quotप्रशासनाने जनभावनेचा विचार करणे आवश्यक&quot महापौरांच्या वाढत्या खर्चावरुन मित्रपक्ष शिंदेसेनेचाही महापौरांना टोला

मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगर पालिका आता 25 लाखाचा खर्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे. महापौरांच सोशल मीडिया सांभाळण्यासाठी मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीमध्ये आज प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. याचपार्श्वभूमिवर महापौरांच्या वाढत्या खर्चावरुन मित्रपक्ष शिवसेनेचाही महापौरांना टोला लगावला आहे. मुंबईच्या महापौरांच्या सोशल मिडीयासाठी 25 लाखांच्या खर्चाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी  शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. 

मित्रपक्ष शिंदेसेनेचाही महापौरांना टोला 
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते अमेय घोले यांनी ट्विट करत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. महानगरपालिकेच्या सोशल मीडिया संदर्भातील खर्चाच्या प्रस्तावाचा प्रशासनाने पुनर्विचार करावा, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे, असं अमेय घोले म्हणाले आहेत. तसेच पुढे ते म्हणाले की, “महायुतीचं सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे आणि जनहितालाच आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे. त्याच भूमिकेतून मुंबईकरांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खर्चांबाबत सामान्य मुंबईकरांच्या मनात कोणताही संभ्रम किंवा गैरसमज निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने पारदर्शकता आणि जनभावनेचा विचार करणे आवश्यक आहे. मुंबईकरांच्या करातून जमा होणाऱ्या प्रत्येक रुपयाचा विनियोग हा मुंबईच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा देण्यासाठीच व्हावा, यासाठी आम्ही आग्रही आहोत. सामान्य मुंबईकरांचे हित प्रथम.” असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

रितू तावडे पुन्हा एका वादाच्या भोवऱ्यात
महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगर पालिका आता 25 लाखाचा खर्च करणार असल्याच्या चर्चांनंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एका निर्णयाने वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. महापौरांच सोशल मीडिया सांभाळण्यासाठी मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीमध्ये आज प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा आजच्या स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मांडला जाणार आहे. या प्रस्तावावरून पुन्हा महापौर रितू तावडे यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे.

1 वर्षाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखाहून अधिक खर्च जाणार असून 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या एक वर्षाच्या कालावधीसाठी 25 लाख 12 हजार 786 लाख रुपये महापौरांच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगर पालिका खर्च केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महानगर पालिका अधिनियम 1888 मधील कलम 69 क च्या सुधारित तरतूदिनुसार स्थायी समितीमध्ये महापौरांच्या प्रसिद्धीसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. या अगोदर महापौरांच जनसंपर्क सांभाळण्यासाठी काढण्यात येणाऱ्या निवेदेवरून जोरदार टीका झाली होती. त्यानंतर देखील सोशल मीडियासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number