Eknath Shinde-Devendra Fadanvis Meeting: एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरा भेट; 20 मिनिटे चर्चा, नेमकं काय घडलं?

दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे.

Eknath Shinde-Devendra Fadanvis Meeting: एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरा भेट; 20 मिनिटे चर्चा, नेमकं काय घडलं?

राज्याच्या राजकीय वर्तुळातून महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र या बैठकीत नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाच्या वतीने गेल्या चार दिवसांपासून या प्रकरणात जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहे. त्यामुळे फडणवीस आणि शिंदे यांच्या भेटीत या सुनावणीसंदर्भातही चर्चा झाल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

याशिवाय नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दाही अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाबाबतही बैठकीत चर्चा झाली असण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number