Dr. Neelam Gorhe यांची विक्रमी पाचवी इनिंग सुरू! 10 नवनिर्वाचित आमदारांचा दिमाखदार शपथविधी

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सलग 5 व्यांदा विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेऊन एक अभूतपूर्व विक्रम आपल्या नावावर नोंदवला.
Dr. Neelam Gorhe यांची विक्रमी पाचवी इनिंग सुरू! 10 नवनिर्वाचित आमदारांचा दिमाखदार शपथविधी

Maharashtra Legislative Council Oath : मुंबईतील विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आज एका नव्या राजकीय अध्यायाची सुरुवात झाली, जिथे 10 नवनिर्वाचित सदस्यांनी आपल्या पदाची शपथ घेतली. या सोहळ्यात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सलग 5 व्यांदा विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेऊन एक अभूतपूर्व विक्रम आपल्या नावावर नोंदवला. याची संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सकाळी 11 वाजता पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सर्व नवनियुक्त शिलेदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

दिग्गज नेत्यांची नवी इनिंग
या शपथविधीमुळे विधानपरिषदेचे वजन अधिक वाढले असून, अनुभवी आणि आक्रमक नेत्यांची फळी सभागृहात दाखल झाली आहे. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासोबतच बच्चू कडू, अंबादास दानवे आणि प्रज्ञा सातव यांसारख्या मोठ्या नेत्यांनी आमदारकीची शपथ घेत आपली नवी इनिंग सुरू केली आहे. तसेच प्रमोद जठार, झिशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे या सदस्यांनीही आज अधिकृतपणे सभागृहाचे सदस्य म्हणून कार्यभार स्वीकारला. बिनविरोध निवडून आलेल्या या 10 शिलेदारांमुळे आता वरिष्ठ सभागृहातील चर्चा आणि कामकाज अधिक अभ्यासपूर्ण होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा – NCP National Executive List : राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहाराच्या चाव्या पवार कुटुंबाच्या हातात, तटकरे – पटेल प्रचंड नाराज, तर जय आणि पार्थवर मोठी जबाबदारी

सभागृहाच्या कामकाजावर प्रभावाची अपेक्षा
'मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की…' या गंभीर शब्दांनी आज विधानभवनाचा परिसर दुमदुमून गेला होता. सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. सलग 5 टर्म निवडून येणाऱ्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अनुभवाचा फायदा राज्याला कसा मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनुभवी नेत्यांच्या जोडीला नव्या दमाचे आमदार आल्याने आगामी काळात जनहिताचे प्रश्न सभागृहात अधिक प्रभावीपणे मांडले जातील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – Nitin Gadkari Bus Travel : पंतप्रधानांच्या आवाहनाला गडकरींचा प्रतिसाद; वाहनांचा ताफा टाळत गडकरींचा साधेपणाचा संदेश

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version