Manoj Jarange Hunger Strike : जरांगेंची प्रकृती खालावली! जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन; म्हणाल्या ‘आपल्या व्यक्तीची काळजी घ्या, सरकार…’

विजय चिडे, प्रतिनिधी  छत्रपती संभाजीनगर : कुणबी म्हणून नोंद असलेल्या मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळावं तसचं मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आज, बुधवारी त्यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती अधिक खालावली असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली. काल मध्यरात्री जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्यांची तपासणी केली. उपचार देण्यासाठी वैद्यकीय […]

Manoj Jarange Hunger Strike : जरांगेंची प्रकृती खालावली! जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन; म्हणाल्या ‘आपल्या व्यक्तीची काळजी घ्या, सरकार…’

विजय चिडे, प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर : कुणबी म्हणून नोंद असलेल्या मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळावं तसचं मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आज, बुधवारी त्यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती अधिक खालावली असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली. काल मध्यरात्री जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्यांची तपासणी केली. उपचार देण्यासाठी वैद्यकीय पथकाचे प्रयत्न सुरु होते. पण जरांगे पाटलांनी उपचार घेण्यास नकार दिला. मनोज जरांगेंची प्रकृती खालवल्याच समजल्यानंतर मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीमध्ये मोठी गर्दी केली. रात्री बारा वाजेपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या तर पहाटेपर्यंत मराठा बांधवांची उपोषणस्थळी गर्दी जमलेली. जरांगे पाटलांच्या मागण्यांसोबतच त्यांना उपचार देण्याचे सरकार आणि प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे. मात्र उपचार घेण्यास नकार दिल्याने बराच वेळ थांबून डॉक्टर परत गेले. रात्री 12 वाजेपर्यंत अंतरवालीतील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

दरम्यान, सरकारच्या शिष्ठमंडळासोबत चर्चा केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये जालन्याचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा समावेश होता. यावेळी त्यांच्याशी बोलताना जरांगे पाटील भावूक झाले. तर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले की, उद्या सकाळपासून आम्ही काम करायला तयार आहोत. जरांगे यांची तब्बेत खूप खराब आहे. त्यामुळे आम्हला त्यांची काळजी आहे. मी त्यांना शासनाच्या वतीने विनंती करते की, त्यांनी उपोषण सोडावे. आमच्यातील संवाद थांबणार नाही, संवाद सुरूच राहील. कृपया उपोषण सोडावे. संवैधानिक मर्यादा वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. संविधानापेक्षा मोठा कुणीही नाही. जरांगे यांची तब्बेत खालावली आहे. मी शिवाजी महाराज यांची शपथ घेते की, आपल्यासाठी ते इथे उभे आहेत. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की, आपल्या व्यक्तीची काळजी घेणे आपलं काम आहे. त्यामुळे तुम्ही देखील त्यांना आवाहन करा. तुम्ही जरांगे यांना आवाहन करा,आरक्षण लागू झालेलं आहे. सरकारच्या गोष्टी आम्ही मांडत आहोत. बलिदान गेलेल्या लोकांच्या कुटुंबियांना नोकरी आणि आर्थिक मदत केली आहे. जास्तीत जास्त लोकांना प्रमाणपत्र देण्यास शासन तयार आहे. 58 लाख लोकांचे नाव प्रत्येक गावात लावू. प्रमाणपत्र रद्द होत असेल तर पाऊल उचलण्यासाठी तयार आहोत. 

हेही वाचा : Operation Tiger : ठाकरे सेनेला मोठा धक्का! नगरपंचायतीच्या ठाकरे गटातील नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक शिवसेनेत; शिंदे सेनेची ताकद वाढली

तसेच काल रात्री उशीरा सरकारच्या शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड यांचा समावेश होता. यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले की, शासनाची भूमिका मांडण्यासाठी आमचे अधिकारी गेले होते. आमचा मसुदा त्यांना दिला आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या सल्ल्याने मसुदा तयार केला होता. सगळ्यांनी बसून अंतिम मसुदा दिला होता. हा प्रस्ताव होता, हीच आमची भूमिका होती. त्यात त्रुटी वाटत असेल तर त्यांनी सांगावे. त्याप्रमाणे निर्णय करू. जिल्हाधिकारी गेल्या होत्या. ते म्हणाले की, अधिकारीपेक्षा मंत्र्यांनी यावे. मात्र आम्ही मसुदा तयार केलायं. त्यातील त्रुटी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगायला हवे होते. उद्या सकाळपर्यंत त्यांनी काही सांगितले तर मग पुढं काय करायचं बघू.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number