‘ते स्टँडअप कॉमेडीत गेले असते तर…’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना विधानसभेत खोचक टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत अप्रत्यक्ष निशाणा साधला.
‘ते स्टँडअप कॉमेडीत गेले असते तर…’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना विधानसभेत खोचक टोला

Devendra Fadnavis Standup Comedian Remark on Raj Thackeray: राज्याच्या पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत अप्रत्यक्ष निशाणा साधला. 'ते आमचे मित्र आहेत आणि ते राजकारणात असल्यामुळे आम्हाला त्यांच्यापासून कोणताही धोका नाही,' असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला. पुढे बोलताना ते म्हणाले की, जर राज ठाकरे राजकारण सोडून मिमिक्री किंवा स्टँड-अप कॉमेडीच्या क्षेत्रात गेले असते, तर आज बाजारातील एकाही स्टँडअप कॉमेडियनला मार्केट उरले नसते. राज ठाकरेंचे नाव न घेता त्यांचा 'मिमिक्री आर्टिस्ट' (नक्कल करणारे कलाकार) असा उल्लेख केल्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

'भाडे के टट्टू' शब्दावरून 'सुपारीबाज' पर्यंत म्हणत उपरोधिक टोला
मिसिंग लिंक प्रकल्पावरील दरड कोसळण्याच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आधी 'भाडे के टट्टू' असे म्हटले होते. या हिंदी वक्तव्यावर राज ठाकरेंनी टीका केल्यानंतर फडणवीसांनी विधानसभेत त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. विरोधी सदस्यांनी मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत भाषा वापरावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. यावर टोला लगावत फडणवीस म्हणाले, 'मी पूर्ण अभ्यास करून तो शब्द मागे घेतो आणि त्याऐवजी अधिक सुसंस्कृत शब्द 'भाटक गदर्भ' किंवा आपल्या सोप्या भाषेत 'सुपारीबाज' हा शब्द वापरतो.' मी भाषणात फक्त एकच वाक्य हिंदीत बोललो होतो, जे समजायला हवे होते त्यांना सोडून दुसऱ्यांनाच त्याची जास्त मिरची लागली, असेही म्हणत त्यांनी टोला लगावला.

हेही वाचा – Bachchu Kadu Vs Jaykumar Gore : विधानपरिषदेत सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी! बच्चू कडूंचा जयकुमार गोरेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव; राजकीय वातावरण तापलं

'7,000 कोटी पाण्यात गेले' या अफवेवर कडक आक्षेप
मिसिंग लिंक प्रकल्पातील पूल आणि बोगद्यांविषयी समाजमाध्यमांवर तसेच राजकीय वर्तुळात चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. खोट्या बातम्या पेरणे आणि पसरवणे हा माझा वैयक्तिक नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. प्रकल्पाचे '7,000 कोटी रुपये पाण्यात गेले' अशा प्रकारच्या अफवा पसरवून राज्याची बदनामी केली जात असल्याचे सांगत त्यांनी टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला. विधीमंडळात आदल्या दिवशी रात्री 3:38 वाजेपर्यंत या प्रस्तावावर प्रदीर्घ चर्चा रंगली होती.

मध्यरात्रीपर्यंत रंगली चर्चा
कायदा-सुव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आणलेल्या या प्रस्तावावर जोरदार घमासान पाहायला मिळाले. या महत्त्वपूर्ण चर्चेत आमदार रोहित पवार, सुरेश धस, सुनील प्रभू, जितेंद्र आव्हाड आणि जयंतराव पाटील यांच्यासह एकूण 32 सदस्यांनी आक्रमकपणे भाग घेतला होता. विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांना मुख्यमंत्र्यांनी आपल्या शैलीत उत्तरे दिली. या भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी टोपी फेकली असता ती अनेकांना का लागली, हे मला अजूनही समजले नाही, असा उपरोधिक सवाल त्यांनी केला.

हेही वाचा – Jayant Patil: 'आमदाराच्या बायकोकडून संपादकांना थेट धमकी…'; जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ; मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version