Devendra Fadnavis on Election Commission : ‘एक दिवस राहिलेला असताना निवडणुका पुढे ढकलणे चुकीचे’, मुख्यमंत्र्यांचा निवडणूक आयोगावर आक्षेप

न्यायालयीन प्रक्रियेमुळे या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे, मात्र <br/>मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक आयोगावर कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याचा आरोप केला आहे.
Devendra Fadnavis on Election Commission  : ‘एक दिवस राहिलेला असताना  निवडणुका पुढे ढकलणे चुकीचे’, मुख्यमंत्र्यांचा निवडणूक आयोगावर आक्षेप

Devendra Fadnavis Objects Election Postponement : राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका (Nagarparishad Election 2025) पुढे ढकलण्यात आल्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेतले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) असा निर्णय घेणं ही मोठी चूक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. "उद्या निवडणुका आणि आज अचानक त्या पुढे ढकलणे, हे अत्यंत चुकीचे आहे," असे फडणवीस यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे अनेक उमेदवारांची प्रचारासाठी (Elction Campaign Maharashtra) घेतलेली मेहनत यामुळे वाया गेली आहे, असे ते म्हणाले.

आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला
न्यायालयीन प्रक्रियेमुळे या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याचे सांगितले जात आहे, मात्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगावर कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याचा आरोप केला आहे. "निवडणूक आयोगाने हा कुठला कायदा  काढलाय, ते मला माहीत नाही, पण माझ्या अभ्यासानुसार निवडणुका अशाप्रकारे पुढे ढकलता येत नाहीत," असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असली तरीही, अशाप्रकारे ऐनवेळी निर्णय घेणे हे चुकीचेच आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

आयोगाला 'रिप्रेझेंटेशन' देणार
निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याने, याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाला 'रिप्रेझेंटेशन' (Representation) देऊ, असे त्यांनी सांगितले. हा निर्णय अनेक उमेदवारांसाठी निराशाजनक ठरला आहे.

आता 20 डिसेंबरला होणार मतदान
या निर्णयामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून ज्या ठिकाणी प्रचाराचा धुरळा उडत होता, तेथील उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे. ज्या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, तेथे आता 20 डिसेंबरला मतदान (Voting) होईल आणि 21 तारखेलाच मतमोजणी (Vote Counting) होणार आहे. मात्र, उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला नियोजित वेळेत पार पडतील.

या 22 ठिकाणच्या नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांना स्थगिती (Nagarparishad Election Postponed) –
अमरावती विभाग : बाळापूर, अंजनगाव सुर्जी, यवतमाळ, देऊळगाव राजा, वाशिम
कोकण विभाग : अंबरनाथ
छ.संभाजीनगर विभाग : फुलंब्री, धर्माबाद, मुखेड, रेणापूर, वसमत
नागपूर विभाग : घुग्घूस, देवळी
नाशिक विभाग : देवळाली-प्रवरा, कोपरगाव, पाथर्डी, नेवासा
पुणे विभाग : बारामती, फुरसुंगी-उरळी देवाची, महाबळेश्वर, फलटण, मंगळवेढा, अनगर

राज्यातील 288 नगरपालिका,नगरपंचायत निवडणुकीची घोषणा झाली होती. मात्र, निवडणूक आयोगाने 22 ठिकाणच्या मतदानाची तारीख पुढे ढकल्यामुळे सावळागोंधळ झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. 

दरम्यान, यापैकी 3 जागांची नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाली आहे. 22 जागांसाठी तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. तेव्हा, उद्या 2 डिसेंबरला 253 जागांसाठी मतदान होणार आहे.

हेही वाचा – Elections 2025 : मुंबईत मतदार यादीत मोठा घोळ! तब्बल 7 हजार मतदारांचे वॉर्ड बदलले

आज प्रचाराचा अखेरचा दिवस
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी रात्री 10 पर्यंतच प्रचार करता येणार आहे. बड्या नेत्यांच्या सभांची धूम सुरू आहे. गेले अनेक दिवस राज्यात सुरू असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या प्रचाराचा (Election Campaign) आज शेवटचा दिवस आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांच्या सभांमुळे आजचा दिवस चांगलाच गाजणार आहे. आज रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावतील.

मुख्यमंत्र्यांसोबतच राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आज अनेक महत्त्वाच्या सभा नियोजित आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सभा आज संभाजीनगर, पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये होणार आहेत. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर आणि संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहेत. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यासह नाशिकच्या भगूरमध्ये सभा होणार आहे.

आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्ष आपली ताकद पणाला लावणार असल्याने, मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा शेवटचा दिवस कसा रंगतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut: “मतदारांना पैसेवाटप करून महाराष्ट्राची निवडणुक संस्कृती बिघडली”; राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version