Datta Meghe Passes Away : दु:खद! दत्ता मेघे यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील दत्ता मेघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Datta Meghe Passes Away : दु:खद!  दत्ता मेघे यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्राचे अनुभवी नेते दत्ता मेघे यांचे काल नागपूर येथे निधन झाले. निधनामुळे विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील दत्ता मेघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाची बातमी मनाला खोलवर वेदना देणारी आहे. त्यांच्या जाण्याने विदर्भाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जीवनाशी घट्ट नाळ जुळलेले एक सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व हरपले आहे. लोकसभा, राज्यसभा आणि विधानपरिषदेतून त्यांनी सातत्याने जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडला. पदापेक्षा माणुसकीला अधिक महत्त्व देणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व हेच त्यांचे खरे वैभव होते. आयुष्यभर त्यांनी जपलेला सेवाभाव आणि दातृत्वाचा वारसा असंख्य लोकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करून गेला”.

हेही वाचा – Ashok Kharat Case: ‘अशोक खरात ही महाराष्ट्रातली एपस्टीन फाईल…’; अरविंद सावंत यांचा महायुती सरकारवर निशाणा 

पुढे त्यांनी लिहिले की,”विदर्भातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यात त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या उभारणीसारख्या उपक्रमांमुळे आरोग्यसेवेचा पाया मजबूत झाला आणि कोविड-19 महामारीसारख्या अत्यंत कठीण काळातही या सुविधांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सावंगी (मेघे) येथील आरोग्यसेवा असो किंवा गडचिरोली-मेळघाटातील आदिवासी भागात पोहोचलेली मदत दत्ताभाऊंनी नेहमीच समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा ध्यास घेतला. शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना नवी दिशा दिली, अनेक गरजू विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले आणि संकटात सापडलेल्या कुटुंबांना आधार दिला. त्यांच्या दारी आलेला कुणीही माणूस निराश परत गेला नाही”. 

हेही वाचा – Aaditya Thackeray: ‘भोंदू बाबासोबत फोटो असणाऱ्या मंत्र्यांवरही कारवाई करा…’; खरात प्रकरणात आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया 

पुढे त्यांनी लिहिले की, “मतभेदांच्या पलीकडे जाऊन नातं जपणारा त्यांचा मोठेपणा नेहमीच प्रेरणादायी राहील. त्यांच्या जाण्याने मी माझा एक जिव्हाळ्याचा आधारस्तंभ गमावला आहे. ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना तसेच असंख्य कार्यकर्त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती”. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number