PM Modi Visit to Japan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जपान दौऱ्यावर असताना दारुमा-जी मंदिराचे मुख्य पुजारी रेव्ह. सेशी हिरोसे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांना दारुमा बाहुलीची विशेष भेट देण्यात आली. दारुमा ही जपानी संस्कृतीतील पारंपारिक बाहुली असून ती शुभेच्छा, चिकाटी आणि ध्येयसिद्धीचे प्रतीक मानली जाते. ही बाहुली झेन बौद्ध परंपरेचे संस्थापक बोधिधर्म (दारुमा दैशी) यांच्यावर आधारित आहे. गोलाकार आणि पोकळ स्वरूपामुळे ती नेहमी उभी राहते. जपानी लोक एखादे ध्येय ठरवताना बाहुलीचा एक डोळा रंगवतात आणि ध्येय पूर्ण झाल्यावर दुसरा डोळा रंगवतात. त्यामुळे ही बाहुली सातत्याने प्रयत्न करण्याची आठवण करून देते.
दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी 15 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. दौऱ्यादरम्यान त्यांनी जपानचे माजी पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि फुमियो किशिदा यांचीही भेट घेतली. या भेटीत तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली.
日本の前内閣総理大臣、岸田文雄氏と素晴らしい会談を行いました。岸田氏は常に、インドと日本の関係強化を力強く推進してこられました。会談では、貿易、重要技術、人材の流動性を含む二国間パートナーシップの進展について議論するとともに、テクノロジーや半導体といった新たな分野における大きな可… pic.twitter.com/BwUAusMuuJ — Narendra Modi (@narendramodi) August 29, 2025
मोदींनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, योशिहिदे सुगा यांच्यासोबत भारत-जपान सहकार्याच्या विविध आयामांवर चर्चा झाली. आमच्या चर्चेत तंत्रज्ञान, एआय, व्यापार आणि गुंतवणुकीत सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. जपानकडून मिळालेली ही भेट भारत-जपान मैत्रीचे प्रतीक मानली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.