नाशिक, १९ मे २०२३, प्रतिनिधी : नाशिक शहरात सीएनजीचा माेठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सीएनजीचा पुरवठा होत नसल्याने शहरातील काही सीएनजी पंपदेखील बंद होते. गुरुवारी मात्र एमदमच तुटवडा निर्माण झाल्याने शहरासह बाहेरुन येणाऱ्या अनेक वाहनचालकांचा खाेळंबा झाला.
पंपचालकांना देखील याची आर्थिक झळ साेसावी लागली. तांत्रिक कारणामुळे मुख्य कंपनीकडून सीएनजी पुरवठा होत नसल्याची पंप चालकांची प्राथमिक माहिती आहे. नाशिकमधील जवळपास ८ ते १० हजार वाहने सीएनजी आहेत. अशातच; मागच्या २ दिवसात या वाहनांना सीएनजी न मिळाल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामध्ये रिक्षा, चार चाकी वाहन, खासगी गाड्या, अश्या अनेक वाहनांचा समावेश आहे.
सीएनजीचा पुरवठा अचानक बंद केल्याने पंपचालकांना वाहनधारकांच्या राेषाला सामाेरे जावे लागले. आता नेमका सीएनजीचा पुरवठा कधी सुरळीत हाेणार ह्या बाबत अद्यापही प्रश्नचिन्हच उपस्थित आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.