सध्या राज्यात 17 जागांवर विधानपरिषदेच्या निवडणूका होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागांसाठी रस्सीखेच सुरु आहे. त्याचवेळी देवगिरी बंगल्यावरील बैठकीत छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्या वाद झाल्याचीही बातमी आली होती.यावर आता तटकरे आणि भुजबळांनी मौन सोडलं आहे.
या संदर्भात विचारले असता मंत्री छगन भुजबळ यांनी कोणताही वाद झाला नव्हता. केवळ मला बोलायचे असल्याने मी त्याला थांबायला सांगितले, आता आम्ही एकत्र आहोता. ‘हम साथ साथ है, काही वाद नाही…’कधी कोणी जास्त बोललं तर आपण बोलतो थांबा जरा तसं झालं होते असेही छगन भुजबळ यांनी सांगत सुनिल तटकरे आणि आपल्यात कोणताही वाद झाला नव्हता असे सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.