CharDham Railway : महाराष्ट्रातील चारधाम यात्रेकरूंना रेल्वेची मोठी भेट! मिरज-सांगली मार्गे थेट ‘हृषिकेश एक्स्प्रेस’ झाली नियमित

सध्या विशेष गाडी म्हणून धावणारी ही ट्रेन जुलै 2026 पासून नवीन नियमित क्रमांकासह धावणार असून, यामुळे 6 राज्यांतील प्रवाशांचा प्रवास थेट आणि सोयीचा होणार आहे.
CharDham Railway : महाराष्ट्रातील चारधाम यात्रेकरूंना रेल्वेची मोठी भेट! मिरज-सांगली मार्गे थेट ‘हृषिकेश एक्स्प्रेस’ झाली नियमित

Badrinath, Kedarnath Train from Miraj Railway Station : केदारनाथ, बद्रिनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारधाम यात्रेला जाणाऱ्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेने प्रवाशांची वाढती संख्या आणि सोय लक्षात घेऊन हुबळी-योगनगरी हृषिकेश एक्स्प्रेस ही रेल्वे सेवा आता कायमस्वरूपी नियमित केली आहे. चारधाम यात्रेचे मुख्य प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या हृषिकेशसाठी आता भाविकांना दिल्लीला जाऊन गाड्या बदलण्याची गरज भासणार नाही. सध्या विशेष गाडी म्हणून धावणारी ही ट्रेन जुलै 2026 पासून नवीन नियमित क्रमांकासह धावणार असून, यामुळे 6 राज्यांतील प्रवाशांचा प्रवास थेट आणि सोयीचा होणार आहे.

नवीन रेल्वेचे वेळापत्रक आणि मार्ग
दक्षिण-पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मंजुनाथ कनमाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाडीचे नियमित संचालन खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:
– हुबळी ते हृषिकेश (ट्रेन क्र. 17363): ही गाडी 6 जुलै 2026 पासून दर सोमवारी सायंकाळी 7.45 वाजता हुबळी येथून सुटेल आणि बुधवारी रात्री 11.30 वाजता योगनगरी हृषिकेश येथे पोहोचेल.
– हृषिकेश ते हुबळी (ट्रेन क्र. 17364): परतीच्या प्रवासासाठी ही गाडी 9 जुलै 2026 पासून दर गुरुवारी सकाळी 6.15 वाजता हृषिकेश येथून निघेल आणि शनिवारी सकाळी 6.30 वाजता हुबळी येथे परत येईल.
– या राज्यांना होणार फायदा: या थेट रेल्वे सेवेमुळे कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि उत्तराखंड या 6 राज्यांतील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

हेही वाचा – NEET Paper Leak Case: प्राध्यापिका मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी; नीट पेपरफुटी प्रकरणी आता होणार आणखी मोठे खुलासे?

महाराष्ट्रातील प्रमुख थांबे
पश्चिम महाराष्ट्रातून चारधाम यात्रेला निघणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे अत्यंत सोयीची ठरेल, कारण या गाडीला महाराष्ट्रातील आणि मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या दोन्ही दिशांनी धावणाऱ्या गाडीचे प्रमुख थांबे असे आहेत –
प्रमुख स्थानके: धारवाड, लोंढा, बेळगाव, घटप्रभा, मिरज, सांगली, कऱ्हाड, सातारा, पुणे, दौंड (कॉर्ड लाईन), अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई (झाशी), ग्वाल्हेर, आग्रा कॅन्ट, मथुरा, हजरत निजामुद्दीन, गाझियाबाद, मेरठ सिटी, मुझफ्फरनगर, देवबंद, टपरी, रुडकी आणि हरिद्वार.

प्रवाशांना अधिकृत माहिती घेण्याचे आवाहन
थेट रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे विशेषतः केदारनाथ आणि बद्रिनाथला जाणाऱ्या वृद्ध आणि कुटुंबासह प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंचे हाल थांबणार आहेत. प्रवाशांनी या गाडीच्या तिकिटांचे बुकिंग, अचूक वेळापत्रक आणि अधिक माहितीसाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला (IRCTC) भेट द्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा – EPFO: निवृत्तीवेतनधारकांसाठी आनंदाची बातमी! किमान निवृत्तीवेतन 1,000 रुपयांवरून 3,000 रुपये, जुलैपासून UPI ​​द्वारे पीएफ हस्तांतरणाची सुविधा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version