Chandivali EVM Inspection and VVPAT Verification : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्देशानुसार, 168-चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम (EVM) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) यंत्रांच्या सखोल तपासणीला आजपासून सुरुवात होत आहे. बोरिवली (पूर्व) येथील राजेंद्र नगर, दत्त पाडा रोडवर असलेल्या भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) गोदामात ही प्रक्रिया पार पडणार आहे. आज सकाळी 9.30 वाजता या कामाला प्रारंभ होईल असून, ही पडताळणी पुढील दोन दिवस म्हणजेच 16 आणि 17 एप्रिल रोजी सुरू राहणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी ही न्यायालयीन पडताळणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
तांत्रिक तपासणी आणि पारदर्शकता
या दोन दिवसीय प्रक्रियेत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांमधील ‘Burnt Memory’ आणि ‘Microcontroller’ यांची तांत्रिक तज्ज्ञांमार्फत सखोल पडताळणी केली जाणार आहे. यंत्रांच्या कार्यक्षमतेबाबत निर्माण झालेली साशंकता दूर करणे आणि निवडणुकीच्या निकालांमधील स्पष्टता तपासणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सकाळी 9.30 वाजल्यापासून ते दिवसाचे काम पूर्ण होईपर्यंत ही यंत्रे तपासणीसाठी खुली ठेवली जातील. या प्रक्रियेमुळे भविष्यात निवडणूक यंत्रणेच्या तांत्रिक बाबींबाबत अधिक पारदर्शकता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माजी मंत्री नसीम खान यांची उपस्थिती
याचिकाकर्ते आणि माजी मंत्री नसीम खान हे या संपूर्ण तपासणी प्रक्रियेच्या वेळी स्वतः आपल्या प्रतिनिधींसह उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली ही पडताळणी होत असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले आहे. संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी या गोदामाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, तपासणीदरम्यान सर्व आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. चांदिवली मतदारसंघातील या तांत्रिक पडताळणीचा निकाल काय लागतो, यावर अनेक राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत.
हेही वाचा – Theft in BMC : मोठी खळबळ! मुंबई महापालिकेच्या “तिजोरीतच हात साफ?” स्थायी समिती सभागृहात 20 हजारांची चोरी
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.