Noida Horror: नोएडा हादरलं! लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने 25 वर्षीय तरुणीवर झाडल्या गोळ्या

मृत तरुणीचे नाव सोनू असं असून ती मूळची अमरोहा येथील रहिवासी होती. तथापी, आरोपी कृष्णा हा बिहारचा रहिवासी असून नोएडामधील एका कारखान्यात काम करत होता.
Noida Horror: नोएडा हादरलं! लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने 25 वर्षीय तरुणीवर झाडल्या गोळ्या

Noida Horror: उत्तर प्रदेशातील नोएडा शहरात शुक्रवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याचा राग मनात धरून एका तरुणाने आपल्या 25 वर्षीय प्रेयसीला गोळ्या झाडून संपवलं. मृत तरुणीचे नाव सोनू असं असून ती मूळची अमरोहा येथील रहिवासी होती. तथापी, आरोपी कृष्णा हा बिहारचा रहिवासी असून नोएडामधील एका कारखान्यात काम करत होता. दोघांमध्ये बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

घटना कशी घडली?

शुक्रवारी संध्याकाळी फेज-2 परिसरात सोनू राहत असलेल्या PG मध्ये कृष्णा थेट घुसला. यावेळी दोघांमध्ये तीव्र वाद झाला. सोनूने त्याच्या लग्नाच्या आग्रहाला नकार दिल्यामुळे संतापलेल्या कृष्णाने तिला जवळून गोळी झाडली. पोलिसांनी तातडीने तरुणीला रुग्णालयात हलवले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हेही वाचा – Train Tragedy : टीसीसोबत वाद विकोपाला; नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा ट्रेनमधून पडून मृत्यू

आरोपी फरार, शोधासाठी चार पथके तयार

याप्रकरणी कृष्णाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे. त्याचा माग काढण्यासाठी चार विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे जप्त केले असून मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू आहे. पोलिस उपायुक्त (मध्य नोएडा) शक्ती मोहन अवस्थी यांनी सांगितले की, 'प्राथमिक तपासात दोघांमधील वादातून कृष्णाने तरुणीच्या खोलीत जाऊन तिच्यावर गोळी झाडल्याचे स्पष्ट झाले आहे.' 

हेही वाचा – Nanded Crime News: कुटुंब हरलं, प्रेम जिंकलं; नांदेडमध्ये प्रेयसीने केले प्रियकराच्या प्रेतासोबत लग्न

दिल्लीत लिव्ह-इन पार्टनरला संपवलं  

तथापी, नोएडातील या घटनेच्या अवघ्या एक दिवस आधी दक्षिण-पश्चिम दिल्लीतील छावला भागात आणखी एक घरगुती हिंसेची घटना समोर आली. 35 वर्षीय वीरेंद्र नावाच्या व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत आपल्या 44 वर्षीय लिव्ह-इन पार्टनरला गळा दाबून संपवलं. वीरेंद्र विवाहित असून त्याला मुलेही आहेत. गेल्या दोन वर्षांपासून तो मृत महिलेसोबत राहत होता. महिलेच्या मालकीचे पालममधील घर विकून आलेल्या पैशातून आरोपीने ऑगस्टमध्ये तीन मजली घर खरेदी केले होते, असे पोलिसांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version