BMC Election 2026 : भाजप कार्यकर्त्यांच्या ’50 खोके’च्या घोषणांमुळे महायुतीत वादाची ठिणगी; एकनाथ शिंदें म्हणाले, ‘मला पूर्ण…’

प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि भाजप कार्यकर्त्यांनी '50 खोके'च्या घोषणा देत शिंदे गटाला डिवचले.<br/>
BMC Election 2026 : भाजप कार्यकर्त्यांच्या ’50 खोके’च्या घोषणांमुळे महायुतीत वादाची ठिणगी; एकनाथ शिंदें म्हणाले, ‘मला पूर्ण…’

BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आपल्याच मित्रपक्षाने (भाजप) '50 खोके'च्या घोषणा दिल्याने शिंदे गटात मोठा संताप निर्माण झाला आहे. या खळबळजनक प्रकरणानंतर आता खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

या वादावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सावध पवित्रा घेतला. ते म्हणाले, 'कोणत्या कार्यकर्त्यांनी काय घोषणा दिल्या याची मला पूर्ण माहिती नाही. मात्र, मुंबईत शिवसेना आणि भाजप पूर्ण ताकदीने निवडणूक लढवत आहेत.' एकीकडे शिंदे प्रकरणावर बोलणे टाळत असले, तरी त्यांचे सहकारी संजय शिरसाट यांनी मात्र भाजपला खडेबोल सुनावले आहेत. अशा घोषणा देणाऱ्यांनी आधी देवेंद्र फडणवीसांना विचारायला हवे होते, असा टोला शिरसाट यांनी लगावला आहे.

हेही वाचा – ED Raid In Nagpur: उद्धव ठाकरेंना मोठा झटका, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष ईडीच्या रडारवर

वॉर्ड 173 मध्ये राडा

चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजपच्या शिल्पा केळुस्कर आणि शिंदे सेनेच्या पूजा कांबळे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि भाजप कार्यकर्त्यांनी '50 खोके'च्या घोषणा देत शिंदे गटाला डिवचले.

भाजप कार्यकर्त्याचा 'यू-टर्न'; 50 नाही तर 11 खोके 

घोषणा देणारे भाजप कार्यकर्ते दत्ता केळुस्कर यांनी या प्रकरणाला नवीन वळण दिले आहे. ते म्हणाले, 'आमच्याकडून थोडे चुकीचे शब्द निघाले. त्यांच्या संपत्तीचे पत्रक पाहता '50 खोके' नाही तर '11 खोके एकदम ओके' अशी घोषणा द्यायला हवी होती. 11 कोटींची ही जंगम मालमत्ता आली कुठून? ही आमची वैयक्तिक घोषणा आहे, पक्षाविरुद्ध नाही. रामदास कांबळे यांनी आमचे तिकीट चोरले, ही लढाई आता अटळ आहे.'

हेही वाचा – Eknath Shinde : अजित पवारांच्या पुण्यात एकनाथ शिंदे कडाडले; लाडकी बहीण योजनेबाबत केलं मोठं वक्तव्य

दरम्यान, राज्यातील 29 महापालिकांसह मुंबईसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडणार असून, 16 जानेवारीला निकाल जाहीर होतील. मतदानाला काही दिवस उरले असताना मित्रपक्षांमधील हा वाद मतदारांवर काय परिणाम करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version