BJP MLA Viral Video : कोट्यवधींचा मालक, पण रस्त्यावर भिकारी बनून फिरण्याची वेळ; भाजप आमदाराचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं असं काय घडलं?

भाजप आमदार पराग शाहांचा भिकाऱ्याच्या वेषातील घाटकोपरच्या रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

BJP MLA Viral Video : कोट्यवधींचा मालक, पण रस्त्यावर भिकारी बनून फिरण्याची वेळ; भाजप आमदाराचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं असं काय घडलं?

राज्यात सध्या सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजप पक्षातील नेत्याचा रस्त्यावर भीक मागतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शहा एक दिवस घाटकोपरच्या रस्त्यावर भिकारी बनून फिरले. मात्र यावेळी त्यांना कोणी ओळखू शकले नाही. सध्या जैन धर्मियांची चातुर्मास सुरू आहे. पराग शहा यांचे गुरु नम्रमुनी यांनी पराग शहा यांना एक दिवस भिकारी बनण्याचा अनुभव घ्यावा असे सुचवले.

हेही वाचा- Election Results 2026 : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपची सरशी; आतापर्यंत 103 जागा काबिज, तर काँग्रेस 65 जागांवर विजयी

गुरूच्या आदेशाचे पालन करीत करोडपती असलेले आमदार पराग शहा यांनी सर्व सुरक्षा व्यवस्था, गाड्या आणि महागड्या वस्तू दूर करून, मेकअप करून भिकारी बनले. भीक मागून खाल्ले आणि भिकारी होण्याचा अनुभव घेतला. त्यांनी हा अनुभव त्यांचे गुरु आणि लोकांसमोर देखील मांडला. ते ज्या ज्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी मेकअप काढून पुन्हा गेले आणि त्या त्या लोकांशी पुन्हा चर्चा केली. चित्रपटात शोभावा असा हा प्रसंग आमदार पराग शहा यांनी अनुभवला.

घाटकोपर पूर्व मतदारसंघाचे आमदार पराग शहा हे मुंबईतील एक प्रसिद्ध आणि संपन्न राजकारणी म्हणून ओळखले जातात. पाच हजार कोटींहून अधिक मालमत्तेचे मालक असलेल्या या आमदाराने एक अभूतपूर्व प्रयोग केला. पराग शहा यांचे हे पाऊल राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण करणारे ठरले आहे. कोट्यवधींचे मालक असतानाही गुरूंच्या आज्ञेला मान देऊन इतका कठीण अनुभव घेणे हे खरच कौतुकास्पद आहे. या प्रयोगाद्वारे ते सामान्य माणसांचे जीवन अधिक जवळून पाहिले आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. चित्रपटात शोभावा असा हा प्रसंग आमदार पराग शहा यांनी अनुभवला
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number