Chitra Wagh On Ashok Kharat Case:"हे सरकार अ‍ॅक्शन घेणार, आता सत्य लपणार नाही" कॅप्टन खरात प्रकरणावर चित्रा वाघ कडाडल्या

नाशिकमधील अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून, या प्रकणावर अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. चित्रा वाघ यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Chitra Wagh On Ashok Kharat Case:&quotहे सरकार अ‍ॅक्शन घेणार, आता सत्य लपणार नाही&quot कॅप्टन खरात प्रकरणावर चित्रा वाघ कडाडल्या

नाशिकमधील अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून, त्याच्याकडे तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान नाशिकमध्ये IPS तेजस्विनी सातपुतेंच्या उपस्थित SIT चे पथकात नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील 12 वरीष्ठ अधिकाऱ्यांसह SIT ची बैठक पार पडली. यावेळी खरातच्या लैंगिक शोषणाचे 58 नाहीतर 100 पेक्षा अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

हेही वाचा- Ashok Kharat Case: ‘कोणाचीही गय करणार नाही…’; अशोक खरात प्रकरणी प्रफुल पटेलांचा कारवाईचा इशारा

राज्यात सध्या स्वयंघोषित बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर अशोक खरात आणि रूपाली चाकणकरांचे अनेक फोटो व्हायरल झाले असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. या प्रकणावर अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. अशातच भाजपमधील नेत्या चित्रा वाघ यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- Ashok Kharat Case: कानाजवळ पुटपुटायचा, पेढा, गायत्री मंत्री म्हणायला लावायचा आणि…; कॅप्टन खरातच्या लैंगिक शोषणाचा ‘हा’ होता पॅटर्न

चित्रा वाघ त्यांच्या एक्स ट्वीट अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या की, “कॅप्टन खरात नामकं भोंदूबाबाचे सगळे काळेधंदे आता उघड होणाार… देवाभाऊंनी SIT स्थापन करून तपास थेट IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या हातात दिला आहे… तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सत्य बाहेर येणार आहे. किती मोठं जाळ आहे ते ही समोर येईल… यात कोणकोण आहेत ते ही समोर येईल. माझी या व्हिडिओच्या माध्यमांतून राज्यातील माझ्या तमाम बहिणींना माझी विनंती आहे. या भोंदूबाबाने जर कोणाला फसवलं असेल, अत्याचार केला असेल, याबद्दल तुम्हाला काही माहिती ही असेल आणि कोणी पिडितही असतील तर कृपया पुढे या… न घाबरता तक्रार करा… आपले देवाभाऊ तुमच्या पाठीशी ठामपणे उभं आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ तुमच्या पाठीशी उभे आहेत, आणि लक्षात ठेवा हे सरकार अ‍ॅक्शन घेत, फक्त भाषण करत नाही…” 

दरम्यान चित्रा वाघ यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली भोंदूगिरीवर थेट प्रहार… SIT action mode मध्ये — IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तपास वेगात! आता सत्य लपणार नाही… फसवणूक झाली असेल तर पुढे या… तक्रार करा… देवाभाऊंच्या नेतृत्वातील महायुती सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभं आहे.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number