Malegaon Crime Case : मालेगाव चिमुरडी प्रकरणात राज्य सरकारचा मोठा निर्णय! उज्ज्वल निकम यांची विशेष नियुक्ती

नाशिकमधील मालेगावमध्ये एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आलीय.

Malegaon Crime Case : मालेगाव चिमुरडी प्रकरणात राज्य सरकारचा मोठा निर्णय! उज्ज्वल निकम यांची विशेष नियुक्ती

नाशिकमधील मालेगावमध्ये एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. इतकचं नव्हे तर हे प्रकरण राजकीयवर्तूळापर्यंत पोहचलं होत. त्यामुळे याप्रकरणावर विरोधकांसोबतच सत्ताधाऱ्यांची देखील प्रतिक्रिया समोर येत होती. या प्रकरणी गावामध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय आरोपी विजय खैरनार याला अटक करण्यात आली असून तो पोलीस कोठडीत आहे.

मालेगाव जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला मागील 11 दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या पोलीस कोठडीत ठेवलं आहे. त्यावेळी त्याला इतर आरोपी सारखंच वागवलं जातं. यामुळे विजय पुर्ण हादरून गेला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली जात आहे. यचपार्श्वभूमिवर ठिकठिकाणाहून आंदोलन देखील करण्यात येत होती. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

मालेगाव चिमुरडी बलात्कार आणि हत्या प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने उज्ज्वल निकम हे मालेगाव डोंगराळे गावातील 3 वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि तिच्या हत्येप्रकरणी घटनेची केस लढणार आहे. दरम्यान या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने व्हावी असी मागणी डोंगराळे गावकऱ्यांची आहे.

हेही वाचा- Nashik Crime : भयंकर! तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृणपणे संपवलं

नेमकं प्रकरण काय?

नाशिकमधील मालेगावमध्ये घडली आहे. एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे 3 वर्षांच्या मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होती. या गावामध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणाने चिमुकलीसोबत अत्याचार केले. याबद्दल तिने कोणाला कधी काही सांगू नये म्हणून त्या नराधमाने चिमुरडीच्या  डोक्यात दगड घालून संपवलं.

समोर आलेल्या माहितीनुसार, विजय संजय खेरनार असं आरोपी तरुणाचे नाव आहे. विजयने मुलीची हत्या केल्यानंतर तो फरार झाला होता.मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्याने हा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. मुलीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी मालेगाव मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेमुळे नाशिकमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number