Raigad-Nashik Guardian Ministers : मोठी बातमी! रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला; गोगावले-महाजनांच्या नावाची घोषणा?

गेल्या काही काळापासून महायुती सरकारमध्ये चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलेला रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

Raigad-Nashik Guardian Ministers : मोठी बातमी! रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला; गोगावले-महाजनांच्या नावाची घोषणा?

रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णायक संकेत मिळत आहेत. गेल्या दीड वर्षांपासून रायगडच्या पालमंत्रीपदावरुन शिवसेना आणि दिवंगत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आग्रही असल्याचं बघायला मिळत आहेत. तर दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी कोण? असा देखील प्रश्न गेले कित्येक वर्ष ऐरणीवर होता.

गेल्या काही काळापासून महायुती सरकारमध्ये चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलेला रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. अशातच रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रायगड आणि नाशिक पालकमंत्रिपदाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. रायगच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांची नियुक्ती तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा- Maharashtra Politics : ‘गोपीनाथ मुंडेंची भाजपमधली घुसमट मी जवळून पाहिली’ बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

त्यामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटल्याचे समोर येत आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक देखील जारी केले आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने आदिती तटकरे या उत्सुक होत्या, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भरत गोगावले हे उत्सुक होते. 15 ऑगस्टला भरत गोगावले यांनीच ध्वजारोहण केलं होतं.

त्यावेळी बोलताना त्यांनी आपणच रायगडचे पालकमंत्री होणार असे संकेत दिले होते. त्यानंतर आज भरत गोगावले यांनी बाजी मारली असून रायगडचे नवे पालकमंत्री म्हणून त्यांची नियुकीत करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नाशिकच्या जागेसाठी देखील महायुतीतील नेत्यांचे दावे-प्रतिदावे सुरू होते.या राजकीय तिढ्यामुळे प्रशासकीय कामे आणि नियोजनावर परिणाम होत असल्याचे चित्र होते. मात्र, वरिष्ठांच्या बैठकीनंतर आणि समन्वय साधल्यानंतर अखेर हा वाद पूर्णपणे निवळला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number