परिस्थितीशी दोन हात करीत भाग्यश्रीने चालवला उद्योग

महिला नेहमीच प्रतिकुल परिस्थितीसमोर हार मानत नाही. उलटपक्षी समोर असलेलं आव्हानातून नवी संधी म्हणून त्या आव्हानाला पाहतात. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. पतीच्या मृत्यूनंतर खचून न जाता स्वत:ने लहानसा उद्योग सुरु करुन आपला उदरनिर्वाह करायला सुरुवात केली. ही कहाणी आहे अमरावतीतील धामणगावमधील मंगरुळ दस्तगिर येथील भाग्यश्री डाफ यांची. भाग्यश्री डाफ यांचं लग्नानंतर अवघ्या एक […]

परिस्थितीशी दोन हात करीत भाग्यश्रीने चालवला उद्योग

महिला नेहमीच प्रतिकुल परिस्थितीसमोर हार मानत नाही. उलटपक्षी समोर असलेलं आव्हानातून नवी संधी म्हणून त्या आव्हानाला पाहतात. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.

पतीच्या मृत्यूनंतर खचून न जाता स्वत:ने लहानसा उद्योग सुरु करुन आपला उदरनिर्वाह करायला सुरुवात केली.

ही कहाणी आहे अमरावतीतील धामणगावमधील मंगरुळ दस्तगिर येथील भाग्यश्री डाफ यांची.

भाग्यश्री डाफ यांचं लग्नानंतर अवघ्या एक वर्षातचं पतीचं निधन झालं. पण भाग्यश्री डाफ यांनी खचून न जाता परिस्थितीशी २ हात केले.

भाग्यश्री डाफ यांनी लहानसा उद्योग सुरु केला. या उद्योगातून त्यांना मिळालेल्या पैशातून आपला उदरनिर्वाह करत आहे.

भाग्यश्री डाफ याची परिस्थिती जेमतेम. पतीचा मृत्यू झाल्यानंतर डाफ कुटुंबीय उघड्यावर आलं. परंतु भाग्यश्री यांनी महिला बचत गटाच्या मदतीने उद्योगाला सुरुवात केली.

शेतातील वड, रुई, पिंपळ, उंबर, दुर्वा, आंबा, तुळस यांच्या काठ्याची पॅकिंग करून बाजारात विक्रील सुरुवात केली. याला नवग्रह असे म्हणतात.

याचं लग्नप्रसंगात वापर केला जातो.

सोबतच त्यांनी फुलवात सुद्धा विकायला सुरुवात केली. त्यांचा हा व्यवसाय जेमतेम जरी असला तरी, या व्यवसायावर त्यांचा संसाराचा गाडा सुरू आहे.

भाग्यश्री डाफ या महिला बचत गटात गेल्यानंतर त्यांना उद्योगाबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर त्या उद्योगाच प्रशिक्षण त्यांनी भाग्यश्री डाफ यांनी पूर्ण केलं.

उद्योगाला सुरुवात केल्यानंतर महिला बचत गटाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सहकार्य केलं.

घरचा मोठा कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या परिवाराला मोठया संकटांचा सामना करावा लागतो.

परंतु भाग्यश्री डाफ यांनी कुणाचीही मदत न स्वीकारता घरातील जबाबदारी सांभाळत परिस्थितीचा सामना केला. तसेच त्यांनी महिंलासमोर एक आदर्श उभा केलाय.

परिस्थितीला न कंटाळता परिस्थितीचा सामना जिद्दीने जर केला तर जीवनात यश नक्की मिळते, हेच भाग्यश्री डाफ यांच्या संघर्षातून समजतं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number