FDA Action In Maharashtra : FDA च्या कारवाईमुळे भेसळयुक्त, प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले; गेल्या 21 दिवसांत एक कोटी रुपयांचा साठा जप्त

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यापासून राज्यात भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त होण्याचा सपाटा लागला आहे. आयुक्तांनी कडक कारवाई करत विविध ठिकाणी छापे मारले आहेत. दरम्यान, हॉटेल्स, आऊटलेट, रेस्टोरंटमधील खाद्यपदार्थांची तपासणी करत त्याचा दर्जा ओळखून कारवाईची पावले उचलण्यात आली आहेत. गेल्या २१ दिवसांत एफडीएने विविधी पदार्थांवर जप्तीची […]

FDA Action In Maharashtra : FDA च्या कारवाईमुळे भेसळयुक्त, प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले; गेल्या 21 दिवसांत एक कोटी रुपयांचा साठा जप्त

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यापासून राज्यात भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त होण्याचा सपाटा लागला आहे. आयुक्तांनी कडक कारवाई करत विविध ठिकाणी छापे मारले आहेत. दरम्यान, हॉटेल्स, आऊटलेट, रेस्टोरंटमधील खाद्यपदार्थांची तपासणी करत त्याचा दर्जा ओळखून कारवाईची पावले उचलण्यात आली आहेत. गेल्या २१ दिवसांत एफडीएने विविधी पदार्थांवर जप्तीची कारवाई केली असून परवाने निलंबन तसेच मुद्देमाल जप्तीही केली आहे. 

हेही वाचा : Snake at Shah Rukh Khan House : शाहरुख खानच्या 'मन्नत'मध्ये आढळला 8 फुटी साप; सुरक्षारक्षकांची उडाली धांदल

यामध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थांसह प्रतिबंधित अन्नपदार्थांवर FDA ची मोठी कारवाई करण्यात आली असून 28 जुलै ते 17 ऑगस्टदरम्यान राज्यभरात धडक कारवाई केली. यात राज्यव्यापी विशेष तपासणी मोहिमेत दूध व दुग्धजन्य पदार्थ, अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. कारवाईत 2 लाख 34 हजार 640 प्रमाणातील कोलोस्ट्रमचा साठा जप्त केला असून अंदाजे 2 लाख 12 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर पान मसाला, गुटखा विक्री, वितरण आणि वाहतूक प्रकरणी नऊ प्रथम खबर अहवाल दाखल करण्यात आला असून 10 जणांना अटक केली. या कारवाईत 99 लाख 39 हजार 408 रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला. दूध व दुग्धजन्य पदार्थ, बेकरी पदार्थ, खाद्यतेल आदी इतर अन्नपदार्थांचा सुमारे 8 लाख 22 हजार 540 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून एकूण 65 हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांची तपासणी केली. तर 50 आस्थापनांना सुधारणा नोटिसा, 8 अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. प्रतिबंधित आणि इतर अन्नपदार्थांसह एकूण 1 कोटी 9 लाख 61 हजार 944 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कारवाईदरम्यान एकूण 11 वाहनेही जप्त केली. एफडीएच्या या राज्यव्यापी कारवाईमुळे भेसळयुक्त आणि प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number